Posts

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

पाथरी जवळील बोरमाळा छोट्याशा गावातील लहान मुलास वाघाने जंगलात पळूवून नेले.

अजूभाऊ रेड्डी यांची टरबुजाची शेती,सहा एकरात पहिला प्रयोग

अवैध दारू विक्रीच्या विरोधात दहेगाव गावातील महिलांचा एल्गार

साहेब आमची बस सुरू करा.विद्यार्थ्यांची मागणी **सामाजिक नेते किशोर टोंगे यांनी घेतली विद्यार्थ्यांची दखल**

श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समीती वरोरा श्रीराम मंदीर देवस्थान वरोरा, आयोजीत भव्य शोभायात्रा.

वंधली सेवा सहकारी संस्थेवर शेतकरी परिवर्तन पॅनल चा दणदणीत विजय

उच्च न्यायालयाने एकोणा कोळसा खाणीला दिले तीन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश*

आनंदवनात पार पडणार व्हॉइस ऑफ मीडियाचा कौटुंबिक स्नेह मिलन सोहळा*