आनंदवनात पार पडणार व्हॉइस ऑफ मीडियाचा कौटुंबिक स्नेह मिलन सोहळा*


आनंदवनात पार पडणार व्हॉइस ऑफ मीडियाचा कौटुंबिक स्नेह मिलन सोहळा

पत्रकारांसाठी दहा लाख रुपयाचा विमा वाटप
पत्रकारांच्या मुलासाठी शैक्षणिक शुल्काचे नियोजन

वरोरा : व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आनंदवनात रविवार २ एप्रील रोजी पत्रकारांचा कौटुंबिक स्नेह मिलन सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे.

या आयोजित सोहळ्याला व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मार्गदर्शक संदीप काळे, ग्रामीण प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, कार्यालयीन राष्ट्रीय सचिव दिव्याजी भोसले, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक आणि सामाजिक उपक्रम समितीचे
राज्य प्रमुख आनंद आंबेकर उपस्थित राहणार असुन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा आनंदवनचे प्रमुख विकास आमटे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

या सोहळ्या दरम्यान आनंदवन निर्मित ऑर्केस्ट्रा स्वरानंदवन चे सादरीकरण होणार असुन व्हॉइस ऑफ मीडिया च्या पत्रकारांच्या परीवारासाठी खास करून महिला व बच्चा कंपनीकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २ एप्रील २०२३ रोजी सकाळी

१० वा. पासुन स्नेहमिलन सोहळ्याला प्रारंभ होणार आहे या सोहळ्या दरम्यान प्रत्येक सदस्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा यावेळी दहा लाखाचा विमा काढला जाणार आहे. याव्यतिरिक्त 25 हजाराच्या खालील मासिक उत्पन्न असलेल्या पत्रकारांच्या मुलासाठी शैक्षणिक शुल्क किंवा संबंधित साहित्य देण्याविषयी नियोजन आखल्या जाणार आहे. या मेळाव्याला तालुक्यातील सर्व सदस्यांनी कुटुंबासह उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, चंद्रपूर शहराध्यक्ष सारंग पांडे, सोहळा संयोजक समिती प्रा. डॉ. यशवंत घुमे, कार्याध्यक्ष अनिल पाटील, संघटक चेतन लुतडे, तालुकाध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी वरोरा तालुका च्या वतीने करण्यात आले आहे.

किशोर भाऊ तुम्ही यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे
Happy Birthday Thorvi 

Comments