पिजदुरा गावातील लाभार्थी शेतकरी शेतमजूर खावटी रकमेपासून वंचित**पशुसंवर्धन विस्तार अधिकारी नेवारे यांचे शेतकरी शेतमजूर याना आश्वासन*

*पिजदुरा गावातील लाभार्थी शेतकरी शेतमजूर खावटी रकमेपासून वंचित*

*पशुसंवर्धन विस्तार अधिकारी नेवारे यांचे शेतकरी शेतमजूर याना आश्वासन*

वरोरा : महाराष्ट्र शासनाच्या पशु जनावरे वाटप योजने अंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडून गावातील शेतकरी, शेतमजूर यांना पशु  जनावरे वाटप केल्या जाते तसेच पशु वाटप केल्यानंतर जनावरांना लागणारे खाद्याकरिता खावटी म्हणून शासन खाद्याची रक्कम शेतकरी शेतमजूर यांचा बँक खात्यात जमा करत असते.वरोरा तालुक्यातील पिजदुरा गावातील असे लाभार्थी शेतकरी शेतमजूर यांच्या खात्यात दोन महिन्यापासून शासनाने खावटीची रक्कम जमा केली नाही. पिजदुरा गावातील लाभार्थी शेतकरी शेतमजूर वारंवार संबंधित विभागाला विचारणा करूनसुद्धा प्रश्न सुटत नसल्याने  लाभार्थी शेतकरी  शेतमजूर यांनी दि. 9 ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरकर यांची तात्काळ भेट घेऊन समस्यांचे निवारण करण्याची विनंती केली .

शेतकरी शेतमजूर यांच्या प्रकरणाची दाखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांचा मार्गदर्शनात तालुका प्रमुख दत्ता बोरकर यांच्या नेतृत्वामध्ये उपतालुकाप्रमुख टेमुर्डा-चिकणी क्षेत्र गजानन गोवरदिपे, अशोकभाऊ गेडाम, युवा सेनेचे निखिल मांडवकर, उज्वल काळे, सुरज चांदेकर व पिजदुरा गावातील पीडित शेतकरी शेतमजूर सुखदेव आत्राम, रामकृष्ण श्रीरामे, सुधाकर मडावी, दशरथ चौधरी, सुरेश चांदेकर, पांडुरंग आत्राम, विनोद आत्राम, रामभाऊ रंदई, संतोष दडमल यांनी पशुसंवर्धन विस्तार अधिकारी नेवारे यांची भेट घेवून निवेदन दिले व समस्याबाबत चर्चा केली. 
पशुसंवर्धन विस्तार अधिकारी नेवारे यांनी लवकरात लवकर समस्या मार्गी काढण्याचे आश्वासन दिले. 
पिजदुरा गावातील पीडित शेतकरी शेतमजूर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे,  तालुका प्रमुख दत्ता बोरकर तसेच ईतर पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केलेत.

Comments