वरोरा पोलिसांची बामर्डा रेती घाटावर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नोपाणी यांची कारवाई

वरोरा पोलिसांची बामर्डा रेती घाटावर कारवाई

उपविभागीय पोलीस अधिकारी नोपाणी यांची कारवाई

वरोरा
-=============================
दिनांक मंगळवारी २८/०२/२०१३ रोजी वना नदीतील मौजा बामर्डा रेती घाटातुन प्रोक्लेन मशिनव्दारे रेतीचा अवैधरित्या उपसा करून काही हायवा ट्रकमध्ये भरून वाहतुक करीत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्याआधारे श्री. सुभाष शिंदे, उपविभागीय अधिकारी, वरोरा यांचे सहकार्याने श्री. आयुष नोपानी, सहाय्यक पोलीस अधिक्षक, तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांनी सपोनि / अजित देवरे, सपोनि / निलेश चवरे, मनोहर आमने, गुरु शिंदे यांचे मदतीने तसेच श्री. सोनवणे, तहसिलदार, भद्रावती, श्री. ब-हाणपुरे मंडळ अधिकारी, तसेच मौजा बामर्डा येथील तलाठी अशा महसुल पथकाचे मदतीने संयुक्तरित्या छापा घातला. त्यावेळी रेती घाट मालक व त्यांचे सहकारी यांनी नदीचे पात्रात दगड माती टाकुन नदीचे पाण्याचे प्रवाहाची दिशा वळवून रेती दोन प्रोक्लेन मशिनचे सहाय्याने मा. जिल्हादंडाधिकारी यांचे आदेशाचे व रेती घाट लिलाव आदेशातील अटी व शर्तीचे उल्लंघण करीत रेती उत्खनन करीत असता आढळनु आल्याने मौजा बामर्डा रेती घाटातुन र प्रोक्लेन मशिन, ९ हायवा ट्रक, एक बोलेरो गाडी, पिकअप गाडी, ट्रक्समध्ये भरलेली रेती, असा एकुण १,६३,००,०००/- (एक करोड त्रेसष्ट लाख) रुपयेचा मुद्देमाल जप्त केला व घाट मालक आरोपी मोहम्मद ईमरान मो. सिध्दीकी, मुन्ना सिध्दीकी व सुपरवायजर, वाहन चालक, वाहन मालक असे ईतर आरोपी यांचे विरुध्द पो.स्टे. वरोरा येथे कलम ३७९, ४३०, ४३१, १०९, १८८, ३४ भा. दं.वि. सहकलम ४८ (७) (८) महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे महसुल विभागाकडुन दंडात्मक कार्यवाही सुध्दा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Comments