सावली लगत बोरमाळा गावात लहान मुलास वाघाने जंगलात पळूवून नेले.
फक्त बातमी, वरोरा
सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी उपक्षेत्रा अंतर्गत गेवरा बिटातील बोरमाळ छोट्याशा गावातील हर्षद संजय कांरमेगे वय ५ वर्ष असून राहत्या घराच्या अंगणामध्ये सायंकाळी शौचास गेला असता लपून बसलेल्या वाघाने हल्ला चढवून त्याला पकडून जंगलात नेले. सदर घटना बालकाच्या आईसोबत घडली असून महिलेने कोणाला बोलवण्याच्या आतच वाघाने मुलाला जंगलात नेले. या घटनेने मुलाच्या आईला धक्का बसला असून ही घटना गावकऱ्यांना सांगितली.
गावातील नागरीक आरडाओरड होताच घटना स्थळा कडे लाठी काठी घेऊन धावुन आले.तो पर्यंत चिमुकल्या हर्षदला घेवुन वाघ पसार झाला होता,या घटनेची माहीती चंद्रपुर वनविभागाचे विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे व चंद्रपुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी घोरुडे यांना मिळताच अधिकारी घटना स्थळी रात्रीच दाखल झाले.
सावलीचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रविण विरुटकर व पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहोड यांच्या नेतृत्वाखाली वन विभाग पोलीस व गावक-यांनी रात्रभर संयुक्त रित्या सर्वत्र शोध मोहीम राबवली . गावाच्या बाजूला झुडपे असल्याने रात्रीच्या अंधारात बालकाला पाहण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता.
रात्रभर युध्द स्थरावर अथक प्रयत्न सुरु असतांनाच दुसरा दिवस उजाडताच सकाळी सहा वाजताच्या दरम्यान घटना स्थळा पासुन चारशे मीटर वर चिमुकल्या हर्षदचा अर्धवट फस्त केलेला शरीराचा काही भाग सापडला. मनाला विचलीत करण्या-या अवस्थेतील शरीराचा अर्धवट कमरे खालील भाग,एक हात व अर्धवट खाल्लेला डोक्याचा भाग आढळुन आला. ही हृदय पिळून टाकणाऱ्या घटनेने गावातील वातावरण सुन्न पडले होते.
शासन नियमानुसार मृतकाचे कुटुंबास तातडीची मदत म्हणून पंचेविस हजार रोख,व चार लाख पंचाहत्तर हजारांचा धनादेश स्थानीक सरपंच भोजराज धारणे व उपसरपंच यांच्या उपस्थितीत विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे यांनी सुपुर्द केला.
रोहन खंनके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
संराना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा
Comments
Post a Comment