साहेब आमची बस सुरू करा.विद्यार्थ्यांची मागणी **सामाजिक नेते किशोर टोंगे यांनी घेतली विद्यार्थ्यांची दखल**
विद्यार्थ्यांची मागणी.
सामाजिक नेते किशोर टोंगे यांनी घेतली विद्यार्थ्यांची दखल
शेगाव बु.
चेतन लूतडे वरोरा
शेगाव बुजु्क येथील सोनेगावं. लोधी (साखरा) परिसरातील शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. कित्येक वर्षापासून सोनेगाव या ठिकाणी महामंडळाची बस पोहोचली नसून गावकऱ्यांना सात किलोमीटर दूर जाऊन चारगाव खुर्द किंवा शेगाव बुद्रुक येथून गाडी पकडावी लागत आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास 800 असून आजूबाजूच्या परिसरात बरेच गावे बस सेवे पासून वंचित आहे.
मात्र महामंडळाने अजून पर्यंत या भागात बस चा थांबा दिला नसून हजारो गावकऱ्यांना नाईलाजास्तव पाच ते सात किलोमीटरची पायपीट करून लालपरीला गाठावे लागते . या संबंधात ग्रामपंचायतचा ठराव घेऊन गावकरी व विद्यार्थ्यांनी सामाजिक नेते किशोर टोंगे यांच्या नेतृत्वात वरोरा आगार व्यवस्थापक डोंगरकर यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी किशोर टोंगे यांनी आगार व्यवस्थापक सोबत चर्चा केली असून वरोरा -टेमुर्डा -खेमजई- साखरा -चारगावं खुर्द या मार्गांवर गावकरी व विद्यार्थ्यांसाठी बस लवकरच सुरू करण्याची मागणी केली. यासाठी जिल्हा आगार व्यवस्थापकाकडे पाठपुरावा करून बस सुरू करण्यासाठी स्वतः व्यवस्थापकाकडे प्रश्न मांडनार असून गावकऱ्यांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये जनतेचे प्रश्न उचलणारे नेते निवडून द्यावे अशी गावकऱ्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
यावेळी निवेदन देण्यासाठी किशोर टोंगे यांच्या सोबत विद्यार्थी प्रतिनिधी प्रदिप विठ्ठल, लिल्हारे , पुरूषोत्तम किसन ठाकरे व त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment