वरोरा
दिपक शिव
स्व.विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान ,भद्रावती आयोजित विदर्भ स्तरीय
"स्मृतिगंध" काव्य संमेलन,दि.१९/३/२०२३ ला श्री.गुंडावार सभागृहात संपन्न झाले."खुले कविसंमेलन" या सत्रात कविसंमेलनाध्यक्ष पद स्वीकारताना प्रत्येकच कविता लक्ष पूर्वक ऎकून तिला न्याय देण्याची फार मोठी जबाबदारी सांभाळावी लागली .ते समाधान अनुभवताना निश्चितपणे आनंद होतो.या कविसंमेलनात जवळ जवळ ३२ कवींनी सहभाग नोंदविला एका पेक्षा एक नवीन विषयांवरील कविता सादर झाल्यात त्यात चि.भूपेश या बाल कवीने "सॆनिक जन्म घेतील भारतात" ही देशप्रेम दर्शवणारी कविता सुरुवातीलाच सादर केली.खंत,कवितेच्या काठावर-हरितक्रांती,उंदीर,
बाप,लोकशाहीतील पत्रकारिता,घर,स्त्री,सवय,
शिर्षक असलेल्या कवितांसोबतच, श्री.उसेवारांनी ,मार्मिक पण मिष्किल कविता सादर केलीत,पेंशन,माणसे वाचन, श्री.जितेश कायरकरची "तरुणी " ही कविता, श्रीमती दिव्या यांची "शक्ति की नारी" ही कविता तृप्तीचा ,सुखद अनुभव देऊन गेल्या ,वणव्यातील माती,अभंग आणि ५ गझल वाचल्या गेल्या त्या हृदयावरती अधिराज्य गाजवून गेल्या ,श्री.रितेश पराते यांची "प्रश्नांची गर्दी" ही कविता अनेक उत्तरे देऊन गेली.
तर "मला पेटवायची आहे होळी" ही कविता नफरत आणि उद्वेग यांने व्यापलेली होती,भक्ती रस ओतलेले काही अभंग, पळस, सुक्ष्म देहातील माणूस,श्री.तराळे अतिशय वृध्द व्यक्तिमत्व यांनी "मद्यपान" या विषयावरची कुटूबं चा होणारा -हास या वर अभिव्यक्त झाले.शेतक-यांचे अश्रृ दर्शविणा-या शेवटच्या दोन कविता अस्वस्थ करुन गेल्या, "माणसा मधला माणूस" एक कोड सांगून जाणारी कविता...या कविता ऎकताना कवितेचा दर्जा उंचावतो आहे हे नमूद करावेसे वाटते.सर्व कवींचे मनःपूर्वक अभिनंदन,उत्तम सहज सुंदर सूत्रसंचालन करणा-या श्रीमती आरती रोडे यांचे कॊतूक करायला हवे,आयोजक मा.श्री.प्रविणजी आडेकर आणि सहकारी यांचे मनापासून आभार यथोचित्त सन्मान केला.
Comments
Post a Comment