निवृत्त अंगणवाडी सेविका अजूनही अंधारातच .कोणी माझ्याघरी एक लाईट बल लावून देता का ?

निवृत्त अंगणवाडी सेविका अजूनही अंधारातच

कोणी माझ्याघरी एक लाईट बल लावून देता का ?

वरोरा९/३/२३
चेतन लूतडे 

महावितरण कंपनीने लाईन न दिल्याने गेल्या कित्येक वर्षापासून निवृत्त अंगणवाडी सेविका अंधारात राहत आहे. वरोरा शहराजवळ चीनोरा परिसरात असलेले हूडकी या लहानशा वस्तीत शोभा महामुनी व त्यांच्या परिवार राहत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असून या झोपडीत गेल्या पाच वर्षापासून त्या राहत आहेत. मात्र काही दिवसापूर्वी त्यांचा मुलगा मरण पावला. यानंतर त्यांची परिस्थिती अजूनच बिकट झाली. आता त्यांच्या डोळ्यांनी सुद्धा बरोबर दिसत नाही. काम करणारा मुलगा सोडून गेल्यानंतर त्या सध्या एकट्याच राहत आहे. एका हॉटेलमध्ये पोळ्या लाटण्याची छोटीशी नोकरी करून त्या स्वतःचा उदरनिर्वाह करून जगत आहे. मात्र रात्र झाली की राहत्या झोपडीत जायला भीती वाटते. अशाही बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी महावितरण कंपनीला बऱ्याच वर्षापासून एक लाईट बल झोपडी मध्ये सुरू करून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र वारंवार तोंडी संवाद व जवळ असलेले कागदपत्रे देऊन सुद्धा लाईन मिळत नसल्याने त्या वैतागल्या आहेत. पैसे सुद्धा भरायला तयार आहेत मात्र महावितरणचा अजब निर्णय त्यांना सांगण्यात आला. झोपडी पर्यंत नेण्यासाठी पोल आणि तारा तुम्हाला टाकावे लागेल. एवढा मोठा खर्च पाहून त्या कार्यालयातून वापस आल्या. पायाचे ऑपरेशन झाले असून चालणे कठीण असल्याने महावितरणच्या चक्रा मारून मारून थकल्या आहे. त्यानंतर सगळ्यांना विनंती करू लागल्या मात्र अजून पर्यंत त्यांना विद्युत मीटर व एक लाईट सुद्धा मिळाला नाही. ही झोपडी रोडच्या बाजूला अतिक्रमित जागेवर असल्याने त्यांच्याजवळ काही कागदपत्रे नाही मात्र गेल्या पाच वर्षापासून जीवन जगण्याचा संघर्ष त्या झोपडीत एकट्या करीत आहे. सध्या त्यांचे वय 65 वर्ष असून सध्या त्या जरी ठणठणीत असल्या तरी मात्र रात्रीच्या वेळेस लाईट नसल्याने खूप गैरसोय होते. 
वरोरा येथील संबंधित विभागाचे भोयर  यांच्याकडे एक लाईट देण्याची वारंवार मागणी करून सुद्धा ती दिली जात नाही. यासाठी पत्रकार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांनी सुद्धा परिस्थितीची  माहिती महावितरणला कळवली  मात्र महावितरण कंपनीला अजून पर्यंत जाग आली नाही.

मात्र वरोरा शहरात रोडच्या कडेला सर्व पानठेल्यांमध्ये अतिक्रमित जागेवर महावितरण कंपनीने हजारो  इलेक्ट्रिक मीटर देऊन रोशनाई केली आहे. हे मात्र विशेष.

त्यामुळे वैतागलेल्या अंगणवाडी सेविका शोभा महामुनी यांनी पत्रकारांना बोलवून आपली आप भीती कहाणी सांगितली. या गरीब अंगणवाडी सेविकेला एक तरी लाईट बल कोणी लाऊन देता का? असा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून पडला आहे.
    आज रात्री आंबेडकर चौकात वादविवाद स्पर्धा,

Comments