महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख योगिता लांडगे व महिला पदाधिकार्यांनी आनंद उत्सव साजरा केला.
फक्त बातमी
चेतन लूतडे
महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख योगिता लांडगे व महिला पदाधिकार्यांनी आनंद उत्सव साजरा केला.
राज्याचा २०२३-२४ वर्षाचा १६,११२ कोटी रुपये महसुली तुटीचा व पाच लाख ४७ हजार ४५० कोटी रुपये अंदाजित खर्चाचा अर्थसंकल्प गुरुवारी विधानसभेत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, तर विधान परिषदेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सादर केला.
महिलांसाठी अर्थसंकल्पात भरीव कामगिरी असल्याचे मत महिलांनी व्यक्त केली.
*मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात आणण्यात आली आहे.
*महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.
*आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे.
*शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती करणार आहे.
*स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार आहेत.
असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने महिला आघाडी तर्फे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन महिलानी केले आहे. वरोरा येथील रत्नमाला चौकात बँड वाजवून पेढे वाटून हा आनंद साजरा केला.
याव्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्यांना मिळणार असून महाराष्ट्रातील विमानतळ, स्मारक, व पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न केले आहे.
त्यामुळे हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत महिला जिल्हाप्रमुख शिवसेना योगिता लांडगे व जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी व्यक्त केला. यावेळी वरोरा येथील रत्नमाला चौकात शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Comments
Post a Comment