चंद्रपूर - भद्रावती तालुक्यातील मांगली येथे अज्ञात व्यक्तींनी जगन्नाथ बाबा मंदिर येथील दान पेटी फोडून तिथे राहणाऱ्या दोघांची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
काल रात्री मांगली शेत मालक बापूजी खारकर ७० वर्ष व सहकारी मधुकर खुजे ७१ वर्ष हे शेतातील जगन्नाथ बाबा मंदिर येथे झोपले असताना काही दरोडेखोरांनी सर्व प्रथम झोपेत असलेल्या बापूजी व मधुकर यांच्यावर लोखंडी सब्बलीने वार करून दोघांची हत्या कण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोघांची हत्या केल्यानंतर दरोडेखोरांनी मंदिरातील दानपेटी घेऊन पसार झाले. ही हत्या लोखंडी सब्बल ने केली आहे. दरोडे खोर दान पेटी घेऊन पसार झाले. दानपेटीत किती रक्कम होती याबाबत पोलिस अनभिज्ञ आहेत. घटनास्थळावर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी हजर असून पोलीस तपास सुरू आहे. आहे. जिह्यात गुन्हेगारी चा ग्राफ वाढत असताना पोलिसांना आणखी या घटनेने चिंताग्रस्त केले आहे. दुहेरी खूनाच्या या घटनेने गाव हादरून गेले आहे. पोलिसांचा मोठा ताफा या ठिकाणी असून आरोपीचा मागोवा घेतला जात आहे.
Comments
Post a Comment