दिंडोदा बॅरेज प्रकल्पग्रस्तांचे नदीपात्रात मानवी साखळी आंदोलन बैलांची सुद्धा साखळी लावण्यात आली .

दिंडोदा बॅरेज प्रकल्पग्रस्तांचे नदीपात्रात मानवी साखळी आंदोलन  

बैलांची सुद्धा साखळी लावण्यात आली होती.

३२ गावातील प्रकल्पग्रस्त यांचा बैलबंडी मोर्चा. 

वरोरा
चेतन लूतडे 

वरोरा तालुक्यातील दिंडोदा या गावाजवळ वर्धा नदीपात्रात दोन दिवसाचे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या सर्व परिवारातील कुटुंबीयांनी रात्रभर जागून भजन कीर्तन करत हे आंदोलन वर्धा नदी पात्रात सुरू केले होते. दिंदोडा बॅरेज प्रकल्पात तीन जिल्ह्यातील  यवतमाळ,चंद्रपूर, वर्धा गावातील ११०० शेतकर्याची १४००हेक्टर जमीन या प्रकरणात हस्तांतरित करण्यात आली आहे. 1993 साला यांना सानुग्रह अनुदान म्हणून हेक्टरी तीन लाखाची मदत सरकारने केली होती. तेव्हा ती जागा निपों अँड डेड्डोला देण्यात आली होती. मात्र यानंतर दिंदोडा बॅरेज  प्रकल्पात ही जमीन हस्तांतरण करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यासंबंधीतील अवार्ड, पुनर्वसन, किंवा वाढीव सानुग्रह अनुदान अजून पर्यंत देण्यात आले नाही.

 त्यामुळे सरकार कडे 2013 च्या नवीन कायद्यानुसार जमिनीचा योग्य मोबदला  व पुनर्वसन- शेतमजूर  यांना योग्य पॅकेज. मिळण्याची मागनी करत आहे.
या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व सहभागी होण्यास ज्ञानेश्वर रक्षक-गुरुदेव सेवा मंडळ, दिनानाथ वाघमारे व मुकुंद अडेवार-विमुक्त भटके संघर्ष समिती,  यांनी पाठिंबा दिला आहे.
बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असून अधिवेशन सुरू असल्याने शेतकऱ्यांनी दिंदोडा बॅरेज प्रकल्पाचे काम बंद पडले आहे. शेतकरी आक्रमक झाले असून न्याय मिळवण्यासाठी नदीपात्रात आंदोलन करत आहे.

हे बॅरेज भद्रावती येथे १९९३ मध्ये होवू घातलेल्या निप्पोन डेनरो साठी होणार होते.पण निप्पोन डेनरो रद्द झाले.अन दिंडोदा बॅरेज थंड बस्त्यात गेले.मग एकदम २०१७ ला हा प्रकल्प सिंचन प्रकल्प म्हणून जाहिर झाला.आज या प्रकल्पाची किंमत चवदाशे कोटी झाली आहे.
पण शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला, योग्य पुनर्वसन, मच्छीमार, शेतमजुरांना योग्य पॅकेज ,ही बाधीत ३२ गावाची -तीनही जिल्ह्यातील मागणी आहे.
सरकार तातडीने लक्ष घालावे व ३२ गावाच्या लोकांना न्याय द्यावा एवढी  मागणी करत आहे.

Comments