*तहसील कार्यालयासमोर ठिय्या आणि निदर्शने
वरोरा : १नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर सेवेत रुजु झालेल्या राज्यसरकारी व निमसरकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह अनेक २२ मागण्या घेऊन राज्य कर्मचारी समन्वय समितीने दि.१४ मार्च २०२३ पासून पुकारलेल्या बेमुदत संपात वरोरा तालुक्यातील सर्व कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहे. यामुळे शाळा आणि सर्व शासकीय
कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्याचे पहायला मिळाले. तसेच आरोग्य विभागाच्या कामावर देखील याचा परिणाम झाला.दरम्यान तहसील कार्यालया लगतच्या प्रांगणात संपकरी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले. सरकार विरुद्ध निदर्शने करून सर्व मागण्या त्वरित मान्य करण्याची मागणी केली.जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत संप कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
Comments
Post a Comment