वरोऱ्यात शिंदे गटाच्या वतीने ८ आणि ९ मार्च रोजी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा

वरोऱ्यात शिंदे गटाच्या वतीने ८ आणि ९ मार्च रोजी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा 

वरोरा : अनिल पाटील
स्व. ॲड मोरेश्वर टेमुर्डे आणि स्व. डॉ विनायक वझे यांच्या स्मृती प्रित्यर्थ वरोरा येथे खुल्या राज्य स्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन शिंदे गटाच्या तालुका शिवजयंती उत्सव समिती च्या वतीने करण्यात आले आहे.

दि ८ आणि ९ मार्च ला  आंबेडकर चौक नाका  वरोरा येथे ही स्पर्धा होणार आहे.
भारतीय राज्य घटनेत कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे कीवा नाही या विषयावर सदर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक सात हजार, द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये आणि तीन हजार रुपये तृतीय परितोषिक  दिले जाणार आहे .या सोबतच काही उत्तेजनार्थ  आकर्षक  बक्षिसे ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत स्पर्धकांनी बहुसंख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष  नितीन मत्ते  यांनी केले आहे.

Comments