अजूभाऊ रेड्डी यांची टरबुजाची शेती,सहा एकरात पहिला प्रयोग

अजूभाऊ रेड्डी  यांची टरबुजाची शेती
सहा एकरात पहिला प्रयोग

वरोरा
चेतन लूतडे

वरोरा तालुक्यातील परसोडा गावाजवळ शेतकऱ्यांनी टरबुजाची शेती करून भरघोस उत्पन्न काढले आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात  टरबुज्याच्या मागणीत वाढ होत असून चंद्रपूर जिल्ह्यात या फळाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी अजू रेड्डी यांनी सहा एक किरायाचे शेत करून टरबुजाच्या चांगल्या वाणीचे बी पेरले होते. त्याची उत्तमरीत्या नियोजन करून टरबुजाची शेती पिकवली आहे. त्यांचा आर्थिक खर्च वजा करता चार ते पाच लाखाचे उत्पन्न होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. 
वरोरा तालुक्यात टरबुजाची शेती करणे हे एक नाविन्य असून शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत आहे. 
पुढच्या वर्षी 50 एकर परिसरात टरबुजाची शेती करण्याचा त्यांचा मानस असून शेतकऱ्यांना चांगला प्रकारचा आर्थिक फायदा या शेतीतून मिळू शकतो असे त्यांचे मत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी बदलत्या मोसमाप्रमाणे आपले पीक घेण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला यावेळी त्यांनी दिला आहे.

Comments