तीन किलो मटणावर चोराचे विरजण

*तीन किलो मटणावर चोराचे विरजण
*भरदिवसा कॅमेरा समोरुन दुचाकी पळवली.

वरोरा  21/3/23
चेतन लूतडे 
वरोरा येथील कुंभार मोहल्ला मधील नरडे यांचे किराणा दुकान आहे. या दुकानाच्या समोरून भर दिवसा दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. 

*जाहिरात*
किशोर बोंढे साईनगर  वार्ड येथील रहिवासी असून रविवारी पाच वाजताच्या सुमारास बाजारातील तीन किलो मटन घेऊन मित्रांनी पार्टीचा बेत आखला . त्यासाठी कुंभार मोहल्ला येथील नरडे यांच्या दुकानातून मटन साठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी खाली उतरले व दुकानात जाऊन साहित्य खरेदी केले. मात्र याच दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने तोंडाला दुपट्टा बांधून त्यांच्यासमोरून भरदिवसा दुचाकी पळूवून नेली. यानंतर दुचाकी मालकाला काहीच कळेना.
यानंतर किशोर बोढे यांनी पोलिसात तक्रार केली. व दुचाकी मालकांनी शोध सुरूच ठेवला. पोलिसांनी आपली यंत्रणा फिरवत कॅमेरे चे फुटेज  आपल्या गुप्तहेरा पर्यंत पोहोचविले. पण चोराने तोंडाला बांधून असल्याने ओळखता येत नव्हते. मात्र हे कुठेच पाहिल्यानंतर एका इसमाने या चोरट्याला ओळखले व त्याचा शोध घेणे सुरू केले . दुचाकी मालकालाही ही बाब माहित झाली. हा चोरटा मार्डा येथील देशी दारूच्या दुकानात दारू पीत असल्याची खबर किशोर बोढे गाडी मालक यांना लागतात ते त्या ठिकाणी पोहोचले. त्या नंबरची गाडी तिथेच आढळून आली व त्याला मटणाची विचारना केली मात्र मटन त्या चोट्यांनी फस्त केल्याची कबुली दिली. हि बाब पोलिसांना कळवताच डीबी  इन्चार्ज मित्तलवार व त्यांची टीम  आरोपी शुभम संजय खीरटकर वय 28 वर्ष रा. चोपण ता. मारेगाव जिल्हा यवतमाळ ह.मु. 5 वर्षा पासून बावणे ले आऊट वरोरा याला खाक्या दाखवत अटक केली.
यानंतर या घटनेमुळे या आरोपीकडून तीन दुचाकी  चोराकडून हस्तगत करण्यात आल्या. पोलिसांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला असून अप. न. 232/2023 कलम 379 भा.द.वी. मधील हिरो spendar मो. सा. न. एम. एच. 34 बी. डब्ल्यू. 0133 की.अंदाजे. 80,000/- रु. अप. न. 219/2023 कलम 379 भा.द.वी. मधील सीडी डीलक्स मोटरसायकल नंबर एम एच 34 एके 4106 की.अंदाजे 25,000/- रु व एक हिरो पॅशन प्रो मोसा क्रमांक एम एच 34 A. X.3347 की. अंदाजे 70,000/- रु असा एकूण 175000/- रु. माल जप्त करण्यात आला. 
मात्र रविवारच्या दिवशी तीन किलोचे मटण या चोराने चोरून नेल्याने  मित्रांच्या पार्टीवर विरजण पडले.

आरोपीला अटक केली असून   उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष्य नोपाणी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार काचोरे  व त्यांची टीम पुढील तपास करीत आहे.

Happy Birthday 🎉 pravin Gandhare
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

 वामनदादा तुर्क* यांची  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ सीनेट मेम्बर पदी  निवड झाल्या बदल भाऊचे खुप खुप अभिनदंन 


Comments