दोन मुलींची सुटका
भद्रावती: भद्रावती ते वरोरा मार्गावरील एका घरी एक महिला देह व्यापार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामध्ये पोलिसांनी सापळा रचून या घरात धडक कारवाई करत काही मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
गोपनीय माहिती भद्रावती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली असता सापळा रचत पोलिसांनी धडक कारवाई करीत दोन महिलाना ताब्यात घेतले असून २ युवतींची सुटका करून महिला सुधार गृहात पाठविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार भद्रावती शहरात भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत भद्रावती ते वरोरा मार्गावर एका घरी देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्याठिकाणी पोलिसांनी धाड मारली असता एक महिला इतर महिला व मुलींकडून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता महिलांच्या इच्छेविरुद्ध देह व्यापार करवून घेत होती. पोलिसांनी २ महिलेची सुटका करीत त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. १५ मार्च ला करण्यात आलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या
महिलेवर पोलीस स्टेशन भद्रावती येथे कलम ३७० अंतर्गत सह कलम ३, ४ व ५ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, बिपीन इंगळे, सपोनि स्थानिक गुन्हे शाखा मंगेश भोयर, स्वामी चालेकर, धनराज करकाडे, चंदू नागरे यांनी केली.
जाहिरात
Comments
Post a Comment