ढोल ताशाच्या गजरात नवीन वर्षाची सुरुवात**गांधी उद्यान योग मंडळाचा अभिनव उपक्रम

ढोल ताशाच्या गजरात नवीन वर्षाची सुरुवात

गांधी उद्यान योग मंडळाचा अभिनव उपक्रम

वरोरा22/3/23
चेतन लूतडे

वरोरा शहरात दरवर्षी नवीन वर्षाची सुरुवात ढोलताशाच्या गजरात  केली जाते.
यावर्षी गांधी उद्यान योग मंडळातर्फे गुढीपाडवा दिनानिमित्त भव्य बाईक रॅलीचे आयोजन शहरात करण्यात आले. यावेळी गुढी उभारून वरोरा शहराच्या मुख्य रस्त्यावरून फिरवण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुणाई दुचाकी वरून जल्लोष साजरा करताना दिसून आली.
 लहान मुलांनी सुद्धा आपले कला कौशल्य आंबेडकर चौक येथे दाखवले. ढोल ताशाच्या गजरात आंबेडकर चौकातून शहराच्या मध्यभागातून रॅली काढण्यात आली यावेळी वेगवेगळ्या बँड पथकाने आपला सहभाग दर्शविला या रॅलीमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला ‌ होता. ठिकठिकाणी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आले होते. शिवरायाच्या प्रतिमा समोर अनेक कुटुंबीयांनी आपले छायाचित्र काढून घेतले. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अन्नदान केले. राजकीय नेते सुद्धा या  रॅलीमध्ये सहभागी झाले होते. वरोरा शहरातील मराठी माणसाच्या हृदयात  हा क्षण कायमचा कोरून ठेवला गेला. आज मराठी नवीन वर्षा निमित्त वरोरा शहरात जल्लोष साजरा करण्यात आला.

Comments