अवैध दारू विक्रीच्या विरोधात दहेगाव गावातील महिलांचा एल्गार

अवैध दारू विक्रीच्या विरोधात दहेगाव गावातील महिलांचा एल्गार 

वरोरा २८/३/२३
चेतन लूतडे 
 वरोरा तालुक्यातील दहेगाव येथील गावातील महिलांनी अवैध दारू विक्रीच्या धंद्याबाबत एल्गार उभारला असून राज्य उत्पादन शुल्क व पोलीस स्टेशनला घेराव घालण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. सरपंच विशाल पारखी यांच्या नेतृत्वात वरोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली.

ग्रामपंचायत दहेगाव येथे दि. २४/०३/२०२३ रोजी मासिक सभेत गावातील महिला आणि पुरुषांनी अवैध दारू विक्रती संदर्भात तक्रार अर्ज सादर केला असून वरोरा पोलीस स्टेशन मध्ये यासंदर्भात शेकडो महिलांनी वरोरा ठाणेदार काचोरे यांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी दहेगाव गावातील महिलांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली व्यथा पोलीस निरीक्षकासमोर मांडली. गावातील महिला रोजच्या भांडणामुळे आणि घरगुती त्रासामुळे त्रासल्या असून गावात मिळणाऱ्या अवैध दारूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. 
 त्यामुळेच गावात भांडणतंटे करणे, चौकामध्ये अश्लील बोलणे, घरच्या महिलेला मारहाण करणे तसेच चोऱ्या करणे या समस्या वाढल्या आहेत. तरी उद्भवलेल्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन गावात शांतता तसेच सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी अवैध दारू विक्री बंद करण्याचे निवेदन महिलांनी पोलिसात दाखल केली आहे. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क व पोलीस स्टेशन वरोरा यांनी अवैध दारू विक्रेते धंद्यावर लगाम लावत नसेल तर 'महिलांना सुद्धा दारू विक्रीची परमिशन द्यावी' अशी मागणी करत महिलांनी आपला रोश व्यक्त केला. 

त्यामुळे दहेगाव परिसरातील अवैध दारू विक्री पकडणे पोलिसांसाठी आव्हान असून ठाणेदार कचोरे यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश कर्मचाऱ्याला दिले आहे.

Comments