वरोरा
वरोरा शहराजवळ शेंबळ गावाजवळ भरधाव ट्रक ने वणीकडे येत असलेल्या कारला जबर धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. तब्बल अर्धा किलोमीटर पर्यंत कारला ट्रकने ओढत नेले. या भीषण अपघातात तरुण महिला डॉक्टरचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाले असून त्यांना चंद्रपूर उपचारार्थ हलवले आहे. ही दुर्दैवी घटना बुधवार दि. 22 मार्चला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली.
डॉ. अश्विनी गौरकार- झाडे (31) असे मृतक डॉक्टर चे नाव आहे त्या पाच नंबर शाळे जवळ वास्तव्यास होत्या. तर त्या तीन दिवसापूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर रुजू झाल्या होत्या. त्यांचे पती डॉ. अतुल गौरकार हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे कर्तव्य बजावत होते.
डॉक्टर दाम्पत्य MH-34- AM- 4240 या कार ने वणीकडे येत होते तर विरुद्ध दिशेने ट्रक क्रमांक MH- 34- BZ- 2996 हा ट्रक भरधाव वेगात होता. अचानक दोन्ही वाहने समोरासमोर भिडली. अपघात भीषण होता, यावेळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. तसेच पोलिसांना सुचविण्यात आले. जखमींला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.
Comments
Post a Comment