वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

जागतिक महिला दिनानिमित्त वरोरा स्टेशनचा कार्यभार तांदूळकर यांच्या हाती.

जागतिक महिला दिनानिमित्त वरोरा स्टेशनचा कार्यभार वर्षा तांदूळकर यांच्या हाती.

वरोरा ८/३/२३
चेतन लूतडे 
बुधवारी दुपारी आठ मार्चला महिला जागतिक दिवसानिमित्त वरोरा पोलीस स्टेशन येथे  पोलीस वर्षा तांदूळकर या पोलीस महिला अधिकारीची नियुक्ती वरोरा पोलीस स्टेशनमध्ये देऊन सन्मानित करण्यात आले.

महिला जागतिक दिवस हा दिवस महाराष्ट्रातील आणि जगातील महिलांच्या उत्थानासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या दिवशी, महिला अधिकारींची नियुक्ती अत्यंत सकारात्मक पाऊल असून महिलांना जागृत करण्यास मदत करेल. आणि महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभागात महिला पोलीस दलातील मुलींच्या संख्येची वाढ होण्यास मदत होईल.
एकदिवशीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यामुळे तांदूळकर यांनी महिला समस्या निवारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
     मा. सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी वरोरा यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनात  पोलीस निरीक्षक अमोल काचोरे  यांनी पोलीस स्टेशन पटांगणा जागतिक महिला दिनानिमित्त  पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पदाचा कार्यभार महीला पोलिस उप निरीक्षक वर्षा तांदुळकर यांना ठाणे प्रभारी अधिकारी पदी नियुक्त करून सन्मानित करण्यात आले .

 आजचे प्रभारी अधिकारी यांचे उपस्थितीत पोलिस स्टेशन वरोरा येथे 12.30 वा. पासुन ते 13.30 वा. पावेतो जागतिक महीला दिना निमित्त सर्व महिला पोलिस अमलदार तसेच ईतर सामाजिक क्षेत्रातील महीला यांना मान्यवर तर्फे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित सामाजिक क्षेत्रातील महीला, पत्रकार बंधू तसेच ईतर मान्यवर यांचे समक्ष महिला पदाधिकारी व अमलदार यांना आपले कर्तव्य पार पाडताना येणाऱ्या समस्या बाबत चर्चा करून समस्या समजावून घेतल्या व उचित मार्गदर्शन करून जागतिक महीला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान महिला दिन जागतिक स्तरावर कसे अमलात आले याबाबत माहिती देऊन महिलांच्या दिन कार्यात कशा अडचणी राहतात व सदर  अडचणीवर महिला कशा मात देऊन आपले कर्तव्य योग्य रीता कश्या पार पाडतात याबाबत उपस्थित मान्यवर मंडळी व सत्कार मूर्ती महिला यांना सांगून सदर कार्यक्रम पार पाडण्यात आला.
     यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांच्यासह पोलीस ठाणेदार काचोरे सह  पोलिस स्टेशन वरोरा हद्दीतील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधू व ईतर मान्यवर तसेच पोलिस स्टेशन वरोरा येथील पोलिस अधिकारी व अमलदार उपस्थित होते.

जाहिरात 
             

Comments