वरोरा येथील जीवतोडे गटाचे शिवसैनिक नाराज.

*वरोरा येथील जीवतोडे गटाचे शिवसैनिकांनी पूर्व विदर्भ संपर्कप्रमुखांना दिला घरचा आहेर.

*वरोरा येथील शिवगर्जना सभेला उस्फूर्त प्रतिसाद
*खैरे यांनी भाजपवर साधला निशान.
*निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा

*तालुक्यातील हजारो शिवसैनिक जीवतोडे यांच्या पाठीशी
*सरकारच्या विरोधात टक्कल करून निषेध
*पोलिसांच्या बंदोबस्तात सभा पार पडली.

*शिंदे गटाचे वरोरा येथील बॅनर उलटे करून ठेवण्यात आले.
____________________________________
वरोरा ,चेतन लूतडे,१/३/२३

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे शिवसंवाद व शिवगर्जना असे भद्रावती व वरोरा शहरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही कार्यक्रमाचे बॅनर पोस्टर शहरात लागले होते. सोशल मीडियावर सुद्धा याची प्रसिद्धी करून शिवसैनिकांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र या दोन्हीही कार्यक्रमाची वेळ दुपारी तीन वाजता ठेवण्यात आली होती. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे माजी खासदार खैरे व पदाधिकारी निमंत्रित होते. मातोश्रीच्या प्रोटोकॉलनुसार पहिला कार्यक्रम वरोरा येथे घेण्याचे ठरले होते. मात्र शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांच्या फोनने माजी खासदार खैरे यांचा दौरा भद्रावतीला नेण्यात आला असे मत जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांनी आपल्या वरोरा येथील भाषणात व्यक्त केला. त्यांनी शिवसेनेचा प्रोटोकॉल व जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे व विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्यातील नाराजगी दूर करण्याचा सल्ला वरिष्ठां पर्यंत पोहोचवण्याचा सल्ला दिला.

पण मात्र त्याआधी वरोरा येथील श्री मंगल कार्यालयात जीवतोडे समर्थकांनी पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे, व पूर्व विदर्भ संघटिका तथा प्रवक्ता शिल्पा बोकडे, व त्यांचे सहकारी यांना विरोध करत वापस जाण्याची विनंती केली. प्रोटोकॉल नुसार हा कार्यक्रम होत नसून शिवसैनिकांनी किती वेळ वाट पाहायची तीन वाजता चा कार्यक्रम सात वाजता सुरू होत आहे , जिल्हाप्रमुख जीवतोडे महत्त्वाचे की विधानसभा प्रमुख शिंदे  असा खोचक सवाल वरोरा येथील पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे थोडा वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. यानंतर मुकेश जोवतोडे यांनी शरद कोळी यांना स्टेजवर बोलावून कार्यक्रम सुरू केला. मात्र संपर्कप्रमुख शिवगर्जना सभेच्या बाहेर राहून भाषण ऐकत उभे राहिले. 
यानंतर माजी खासदार खैरे आल्यानंतर ही नाराजी दूर करण्यात आली. यानंतर दोन्ही संपर्क प्रमुखांना स्टेजवर बोलावून सत्कार करण्यात आला.

खैरे यांनी भाजपवर निशाणा साधत गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष केले. निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा असून शिवसैनिकांनी एकजूट होण्याची गरज असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले

याप्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासोबत जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे, रमेश मेश्राम, युवासेना कार्यकारी सदस्य हर्षल काकडे, युवासेना विस्तारक शरद कोळी, पदाधिक सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार,  जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम,  पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे,  पूर्व विदर्भ संघटिका तथा प्रवक्त्या  शिल्पा बोडके, मनीष जेठानी, अमित निब्रड, पिंटू मेश्राम, बंडू डाखरे आधी पदाधिकारी व महिला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मात्र या सगळ्या घडामोडी मध्ये वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील हा वाद चव्हाट्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात गटबाजी होण्याचे संकेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे. 

 *भद्रावती येथील सभेतील घडामोडी* 

महाराष्ट्रातील जनता शिवसेना फोडणार्या आमदार व खासदारांना कदापिही माफ करणार नाही, यावेळी गृहमंत्री अमित शहा , व मोदी सरकारवर टीका करत जोरदार प्रहार खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणात केला.
शरद कोळी यांनी सुद्धा आपल्या शैलीत मोदी सरकारवर व निवडणूक आयोगावर टीका केली.ढ
 भद्रावती येथील श्री मंगल कार्यालयात आयोजित शिवसंवाद कार्यक्रमात मंगळवारी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर युवासेना कार्यकारी सदस्य हर्षल काकडे, युवासेना विस्तारक शरद कोळी, पदाधिक सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार,  जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम,  पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे,  पूर्व विदर्भ संघटिका तथा प्रवक्त्या  शिल्पा बोडके, माजी संपर्कप्रमुख  अजय स्वामी, आयोजक तथा  वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी भद्रावती येथील शिवसंवाद सभेत उपस्थित होते.

जाहिरात.
वकील साहेब आणि वहिनींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Comments