उध्दव साहेब यांचे नेतृत्वाला प्रेरित होवुन रविद्र शिदे यांचे समाजीक कामांची बांधिलकी बघुन पक्ष प्रवेस

*उध्दव साहेबांच्या नेतृत्वाला मान्य करून रविन्द्र शिंदे यांच्या सामाजिक बांधिलकीशी प्रेरीत होवून मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश*

*शिवसेनेत (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) इनकमिंग*

*शिवसंवाद अभियान दरम्यान माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे उपस्थितीत पक्षप्रवेश*

भद्रावती :

शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या सकारात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून वरोरा व भद्रावती तालुक्यातील विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश घेतला. ८०% समाजकारण व २०% राजकारण या तत्वाला घेवून रवींद्र शिंदे यांची पक्षात वाटचाल सुरू आहे. सामाजिक कार्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास राजकारणात वलय निर्माण करीत आहे. या वलयाला आकर्षित होवून विविध पक्षाचे पदाधिकारी, ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायत पदाधिकारी, सहकार सोसायटीचे पदाधिकारी यांनी प्रवेश घेतला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) द्वारा संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंवाद अभियान सुरू आहे. सदर अभियान पूर्व विदर्भात पोहोचले. याच अभियानाचा एक भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक भद्रावती शहरात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नेतृत्वात स्थानिक श्री मंगल कार्यालयात शिव संवाद अभियान कार्यक्रम काल (दि.२८) ला झाला. यावेळी सदर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
यामधे मनसे तालुका प्रमुख वैभव डहाणे, मनसे शहर प्रमुख शरद पुरी, मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अभिजित आष्टणकर, मुधोली ग्रामपंचायतचे सरपंच बंडू नन्नावरे, नंदोरी (बु.) येथील उपसरपंच मंगेश भोयर, ढोरवासा ग्रा.प. सदस्य सतीश वरखडे, भद्रावती विविध कार्यकारी सहकारी सोसायटी भद्रावतीचे अध्यक्ष रोहन कुटेमाटे, कीलोनी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा ग्रा.प. सदस्य नथुजी गाडगे, कढोली ग्रामपंचायतचे मनोज पापडे, मनसे कार्यकर्ते सुरज गेडाम, गणेश मांडवकर, जगन बेलेकर, अजय ब्राह्मणकर, सोनू मोहुर्ले, सृजन मांढरे, प्रज्वल एसम्बरे, भूषण बोनेकर, ओम लांबट, सुजल काकडे, गैराम नैताम, कुंदन मेश्राम, पंकज वसाके, निसार शेख, धीरज गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) प्रवेश घेतला.

शिवसेना म्हटल की आंदोलन आले. या आंदोलनात कार्यकर्त्यांवर पोलीस केसेस लागल्याचे अनेकदा बघण्यात आले. नेता मोठा होत जातो मात्र कार्यकर्ता कोर्टाच्या पायऱ्या झिजवत बसतो. शेवटी नेता मोठा झाला की कार्यकर्त्याला विसरतो. असे अनेक चित्र यापूर्वी क्षेत्रातील राजकारणात बघायला मिळाले आहे. राजकारणाचा हा पायंडा बदलवून निव्वळ पोकळ व परीणामशून्य आंदोलन करण्यापेक्षा मोठ्या समस्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून कायदेशीर मार्गाने सोडविता येते. राजकारण करतांना विरोधास विरोध करण्यापेक्षा जनसेवेवर भर दिला पाहिजे. जनसेवेचे फळ नक्कीच मिळत असते. जनता जनार्दन बरोब्बर लक्ष ठेवून असते. सतत काम करीत राहिल्यास संवैधानिक पदावर जाण्याचा मार्ग मोकळा होतो. माझ्या याच विचारांनी प्रेरित होवून पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे यावेळी रवींद्र शिंदे म्हणाले.

Comments