शिक्षक गेले संपावर... आम्ही आलो रस्त्यावर

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा रस्ता रोको आंदोलन
महामार्गापासून जवळ असलेल्या शेगाव टेंमूर्डा रस्त्यावर आंदोलन

प्रशासकीय अधिकाऱ्याने दिले आश्वासन

वरोरा18/3/23
चेतन लूतडे 

वरोरा तालुक्यातील आसाळा गावामध्ये जिल्हा परिषद च्या मुलांनी आंदोलनाची भूमिका घेतली असून गावातून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मेश्राम घटनास्थळी येऊन मुलांना बाजूला करण्याची प्रयत्न करीत होते.

टेंमूर्डा गावाजवळील पाच किलोमीटर अंतरावर आसाळा गावात जिल्हा परिषद शाळेतील एक ते चार वर्गातल्या शाळकरी मुलांनी  आंदोलन करत  आसाळा गावातील वाहतूक ठप्प कली होती. यावेळी विद्यार्थी मुलांनी शिक्षकांच्या विरुद्ध नारे लावत शाळेत लवकर येण्याची विनंती केली आहे. गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर चौरे  व गावकरी मुलांच्या या निर्णयात सहभागी असून शाळा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करत आहे.

या निर्णयात गावातील राजकीय तशी सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी मुलांसोबत संवाद साधला परंतु विद्यार्थी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्याशिवाय आम्ही रस्ता सोडणार नाही अशी भूमिका घेतल्याने मेश्राम यांनी लगेच बिडीओ यांच्याशी संवाद साधला.  प्रशासकीय अधिकारी नामदेव राऊत शिक्षण विस्तार अधिकारी वरोरा,
खुशाल पाचभाई बीआरसी साधन व्यक्ती घटनास्थळी पोहोचून मुलांच्या समस्या जाणून घेतल्या व गावातील शिक्षित किंवा गटा तर्फे एक ते चार विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्वरित शिक्षक नेमण्यात येईल अशी ग्वाही दिली त्यामुळे गावकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे समाधान झाले असून सोमवारपासून शाळा सुरू करण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले.
शिक्षक सुद्धा शाळेत हजर झाले होते मात्र महाराष्ट्रातील पेन्शन मुद्द्यावरून संपूर्ण संघटना संपावर असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या आंदोलनात आसाळा गावातील शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकर चौवरे ,उपाध्यक्ष स्वाती डुकरे , राजू आसुटकर, आशिष जांभुळे, अशोक मगरे, मोतीराम जांभूळे व विद्यार्थी सामील झाले होते.
जाहिरात 

संपर्क .पदमाकर गोंडे 8855847171

Comments