महामूनी वृध्द महिलेचा ऑनलाइन अर्ज नाही .महावितरण *वृद्ध विधवा महिलेला विद्युत मीटर देण्याचे प्रकरण

दोन वर्षांपूर्वी ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत असताना अधिकारी म्हणतात त्या महिलेचा ऑफलाइन अर्ज नाही 
*वृद्ध विधवा महिलेला विद्युत मीटर देण्याचे प्रकरण 
वरोरा : शहरालगतच्या चिनोरा (हुडकी) येथे अतिक्रमित जागेवर झोपडी वजा घरात एकटी राहत असलेल्या वृद्ध विधवा महिलेला विद्युत मीटर करिता तीन वर्षांपासून महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे वृत्त आज शुक्रवार दि १० मार्च रोजी दैनिक पुण्यनगरी मध्ये प्रकाशित होताच एकच खळबळ उडाली आहे. या वृत्तानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सदर महिलेचा विद्युत मीटर करता ऑनलाइन अर्ज नसल्याचे स्पष्टीकरण दिले. परंतु दोन वर्षांपूर्वी ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत असताना त्या महिलेचा ऑनलाईन अर्ज नाही असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी म्हणणे आश्चर्यकारक आहे. यामुळे सदर प्रकरण अंगलट येत असल्याने अधिकाऱ्यांची सावरासावर सुरू असल्याचे दिसून येते.
 वरोरा शहरालगत चीनोरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेले हूडकी गावठाण येथे अतिक्रमित जागेवर झोपडी वजा घरात ६५ वर्षीय वृद्ध विधवा महिला शोभा महामुनी वास्तव्यास आहे.
मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या  शोभाच्या पतीचे वीस वर्षांपूर्वी निधन झाले.मोठा मुलगा व्यसनाच्या आहारी गेल्याने शोभाने पाच वर्षापूर्वी त्याचे घर सोडले. व ती लहान मुलाला घेऊन चिनोरा (हुडकी) येथे राहू लागली. याच दरम्यान हलाखीच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून लहान मुलाने मृत्यूला कवटाळले. तर सुनेने माहेरचा रस्ता धरला. तेंव्हा पासून सदर महिला एकटी पडली आहे. ती सुमारे तीन वर्षांपासून झोपडी वजा घरातील अंधारात वास्तव्य करीत असून मोलमजुरी करून दिवस काढत आहे. परंतु वाढत्या वयानुसार वृद्धापकाळकडे झालेली वाटचाल,अंधुक दृष्टी आणि  तिचे एकटेपण यामुळे तिला आता घरामध्ये विद्युत प्रकाशाची गरज भासू लागली आहे. या महिलेने तिच्याजवळ असलेल्या कागदपत्रासह महावितरण कार्यालयाकडे विद्युत मीटर करिता अर्ज केला होता. केली. तेव्हा कनिष्ठ अभियंता चुका यांनी तो अर्ज सुनेच्या नावाने करून आणण्यास सांगितले. त्यानुसार शोभा महामुनी यांनी त्यांची सून    च्या नावाने ऑफलाइन अर्ज कनिष्ठ अभियंता चुका यांना नेऊन दिला. त्यांनी तो अर्ज बघून टॅक्स पावती आणण्यास सांगितले. परंतु घर अतिक्रमित जागेवर असल्याने टॅक्स पावती कशी मिळणार असा प्रश्न या महिलेस समोर होता. दरम्यान शोभा महामुनी यांनी उपकार्यकारी अभियंता विनोद भोयर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली व्यथा मांडली. तेव्हा त्यांनी घरी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून मीटर बाबत मदत करू असे आश्वासन दिले. यानंतर शोभा महामुनी यांनी त्यांच्या भाच्यासह महावितरणचे कार्यालय गाठले व विद्युत मीटर बाबत चौकशी केली. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासनच दिले. यानंतर अनेकदा भ्रमणध्वनीवरून कनिष्ठ अभियंता चुका आणि उपकार्यकारी अभियंता विनोद भोयर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. असे असतानाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शोभा महामुनी यांच्या नावाने विद्युत मीटर करिता ऑनलाइन अर्ज नसल्याचे कारण पुढे करून बातमी संदर्भात खुलासा सादर केला आहे. हा प्रकार म्हणजे चौरसावर करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महावितरण अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार -मत्ते
 शोभा महामुनी दोन महिन्यांपूर्वी  माझ्याकडे आल्या होत्या. त्यांनी विद्युत मीटर संदर्भातील आपली व्यथा माझ्याकडे मांडली होती. तेव्हा मी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून असहाय्य वृद्ध महिलेला विद्युत मीटर देण्याची विनंती  केली होती. परंतु त्यांनी टाळाटाळ केली हे आता स्पष्ट झाले आहे. महावितरण कंपनीचे अधिकारी एकीकडे अतिक्रमित जागेवर व्यवसाय करणाऱ्यांना नियम धाब्यावर बसवून चक्क ३३ केव्ही विद्युत लाईनच्या खाली सुद्धा विद्युत मीटर देत आहे. मग अशा वृद्ध विधवा महिलेला विद्युत मीटर देण्यात काही गैर नव्हते. हा प्रकार जागतिक महिलादिनी समोर येणे अत्यंत खेदजनक आहे. यामुळे आपण अत्यंत व्यवस्थित झालो असून या संपूर्ण प्रकरणाची तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करून महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांनी दैनिक पुण्यनगरी शी बोलताना सांगितले.

Comments