सुशोभीकरण करण्यासाठी आलेल्या झाडाची चोरी

सुशोभीकरण करण्यासाठी आलेल्या झाडाची चोरी

फक्त बातमी 

नागपूरमध्ये सध्या G20 च्या निमित्ताने सुशोभीकरण सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि दुभाजकावर झाडं लावली जात आहेत. मात्र, या दुभाजकावर लावलेली झाडंचं चक्क चोरली जात असल्याचा प्रकार घडलाय. नागपूरमधील छत्रपती चौकाजवळ हा झाडं चोरीचा प्रकार घडलाय. एका BMW कारमध्ये दोन तरुण रात्रीच्या वेळी या चौकाजवळ आले आणि दुभाजकावरील झाडं चोरून कारमध्ये टाकली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता तरुण दुभाजकावरची झाडे कशी चोरी करत आहेत. हा सर्व प्रकार एका नागरिकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे.

संपर्क. पद्माकर गोंडे ,आनंदवन चौक, वरोरा 


Comments