*पिपरबोडी चिनोरा गावात विविध विकास कामे करणार.* *आमदार करण देवतळे यांची स्पष्टोक्ती* वरोडा :३०/१/२६ विविध शासकीय योजनांमधून तसेच आमदार निधीतून पिपरबोडी,चिनोरा येथे विविध विकास कामे येणाऱ्या पुढील चार वर्षात करणार असल्याचे प्रतिपादन आमदार करण देवतळे यांनी 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पिपरबोडी,चिनोरा येथे केले. . कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार करण देवतळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , राष्ट्रपिता महात्मा गांधी व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पिपरबोडी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल दडमल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चिनोऱ्याच्या सरपंच ताई परचाके ,उपसरपंच वंदना ढेंगळे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळू भोयर, पत्रकार...
- Get link
- X
- Other Apps