वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

कल्पतरू सोशल युथ फाऊंडेशनचा उपक्रम: गांधी चौकात भारत-न्यूझीलंड टी-२० सामन्याचे लाईव्ह प्रसारण;

कल्पतरू सोशल युथ फाऊंडेशनचा उपक्रम: गांधी चौकात भारत-न्यूझीलंड टी-२० सामन्याचे लाईव्ह प्रसारण; 
वरोरा : वरोरा शहरातील सामाजिक संस्था कल्पतरू सोशल युथ फाऊंडेशन तर्फे क्रिकेटप्रेमी आणि देशभक्तांच्या मनोरंजनासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे. संस्थेने गांधी चौक येथे मोठ्या एलईडी स्क्रीन आणि दर्जेदार साऊंड सिस्टम लावून आयसीसी वर्ल्ड कप टी-ट्वेंटी सामन्याचे लाईव्ह प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

हा  विशेष कार्यक्रम रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यादिवशी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील थरारक सामना पाहण्यासाठी नागरिकांना संधी मिळणार आहे. एलईडी स्क्रीनवर लाईव्ह प्रसारणासाठी संध्याकाळी ७:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

 कल्पतरू युथ फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या उपक्रमामागचा मुख्य उद्देश युवकांमध्ये क्रीडाभावना वाढवणे आणि भारतीय क्रिकेट संघाच्या माध्यमातून देशप्रेमाची भावना निर्माण करणे हा आहे. एकत्र येऊन सामना पाहिल्यास विजयाचा आनंद अनेक पटींनी वाढतो, या भावनेतून हे आयोजन करण्यात आले आहे.

 सामन्याचा आनंद घेता यावा यासाठी गांधी चौकातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यासपीठावर मोठ्या आकाराची एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहे. तसेच, उत्तम दर्जाची साऊंड सिस्टम उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकांनादेखील सामन्याचे थेट वर्णन पाहता येईल.
वरोरा येथील कल्पतरू सोशल युथ फाऊंडेशनच्या वतीने भव्य आयोजन करण्यात येत आहे. 



Comments