वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

*नगरपरिषद तलावाच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी ९३ लक्ष निधी मंजूर!

*नगरपरिषद तलावाच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी ९३ लक्ष निधी मंजूर!* 

*आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; राजुरा शहराच्या वैभवात भर पडणार!*


राजुरा, दि.15/3/2026

राजुरा शहराच्या हृदयस्थानी असलेल्या आणि शहराची प्रमुख ओळख असलेल्या नगरपरिषदेच्या समोरील 'माजी मालगुजारी तलावा'च्या पुनरुज्जीवनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत या तलावाच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटी ९३ लक्ष रुपयांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली असून, आमदार देवराव भोंगळे यांच्या अविरत पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

निधीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेले तलावाचे काम आता पुन्हा जोमाने सुरू होणार असून राजुरा शहराच्या सौंदर्यात मोलाची भर पडणार आहे.
आमदार म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासूनच देवराव भोंगळे यांनी या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू केले होते. यापूर्वी या तलावाचे काम सुरू झाले होते, परंतु तांत्रिक अडचणी आणि निधीच्या कमतरतेमुळे ते बंद पडले. आवश्यक निधीचा प्रस्ताव पर्यावरण विभागाच्या सचिवांकडे प्रलंबित होता. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार भोंगळे यांनी २१ डिसेंबर २०२४ पासून सातत्याने पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या. विशेषतः २५ जुलै २०२५ रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र देऊन या प्रकल्पाचे महत्त्व पटवून दिले आणि तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यांच्या या आग्रही भूमिकेमुळेच आज हा मोठा निधी राजुरा शहरासाठी प्राप्त झाला आहे.

या विकासनिधीच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या समोरील माजी मालगुजारी तलावाचा कायापालट होणार असून येथे एक 'आदर्शवत तलाव' संकल्पना साकारली जाणार आहे. अशी माहिती देत या निधीमुळे राजुरा वासीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विकासकामांचा धडाका असाच सुरू राहील, असा विश्वास आमदार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केला.

*विकासाचा वादा पाळणारा देवरावदादा :*

आमदार देवराव भोंगळे यांनी राजुरा शहरात वास्तव्यास आल्यापासूनच या तलावाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले होते. १२ ऑगस्ट २०२३ रोजी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी तसेच निवडणूक प्रचारसभांमध्ये त्यांनी राजुरावासीयांना या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. हा प्रकल्प निधीअभावी अनेक दिवसांपासून प्रलंबित होता आणि त्याचा प्रस्ताव पर्यावरण सचिवांकडे अडकला होता. मात्र, आमदार भोंगळे यांनी लोकनिर्वाचित होताच २१ डिसेंबर २०२४ पासून या विषयाचा पाठपुरावा सुरू केला.

*अधिवेशनातील आवाज आणि मुख्यमंत्र्यांचा 'हिरवा कंदील'*

आमदार देवराव भोंगळे यांनी केवळ पत्रव्यवहारच केला नाही, तर विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात विविध संसदीय आयुधांचा वापर करून या प्रलंबित निधीकडे शासनाचे लक्ष वेधले. २५ जुलै २०२५ रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन विशेष विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर सकारात्मक शेरा मारत तातडीने निधी देण्याचे निर्देश दिले होते, ज्याची परिणती आता निधी मंजुरीत झाली आहे.
.........

Comments