वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

अवैध दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; १२.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; १२.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

वरोरा (जि. चंद्रपूर) : शहरातील बोर्डा चौक परिसरात अवैधरित्या बनावट देशी मद्याची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एका आरोपीला चारचाकी वाहनासह अटक केली. या कारवाईत सुमारे १२ लाख १९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार, बोर्डा चौक ते राधा मिलन मंगलकार्यालय रोडवर एका स्कॉर्पिओ वाहनात अवैध दारूचा साठा येणार असल्याची माहिती मिळाली. या बातमीच्या आधारे शुक्रवारी (दि. १३) रात्री उशिरा पथकाने सापळा लावून वाहनाची तपासणी केली.

ही कारवाई मा. श्री.डॉ. राजेश देशमुख साहेब, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. जिल्हाधिकारी श्री विनय गौडा साहेब, मा. श्री. प्रसाद सुर्वे साहेब सह आयुक्त, अंमलबजावणी व दक्षता, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.श्री. गणेश पाटील साहेब विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नागपूर विभाग नागपूर, मा. श्री नितीन धार्मिक साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली.

तपासणीदरम्यान, वाहनात 'रॉकेट देशी दारू संत्रा' कंपनीच्या ९० मिली क्षमतेच्या ५० बॉक्समध्ये एकूण ५००० नग बनावट देशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. हे मद्य अवैधरित्या वाहतूक केले जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी संशयित आरोपी आशीष रमेश मीटपल्लीवार (वय २३, रा. बोर्डा, ता. वरोरा) याला तात्काळ ताब्यात घेतले.

घटनेच्या ठिकाणाहून अंदाजे २ लाख रुपये किमतीचे हे बनावट देशी मद्य तसेच महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ चारचाकी वाहन (क्रं. एमएच-३४-सीडी-३३३६) असा एकूण १२ लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ व भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई श्री. प्रवीण मोहतकर (निरीक्षक), श्री. सचिन पोलेवार (दुय्यम निरीक्षक), सागर दिडसे (दुय्यम निरीक्षक), प्रमोद रजोते (दुय्यम निरीक्षक), हर्षराज इंगळे (दुय्यम निरीक्षक), विलास महाकुलकार (जवान) तसेच जवान जितेंद्र आनंद, जगदीश मस्के, मंगेश कुयटे, अमोल भोयर, किशोर पेदुजवार आणि शुभम गोवरदीपे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार करीत आहेत.

Comments