आष्टा येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांची धाड; 81 शिश्या जप्त, आरोपीवर गुन्हा

आष्टा येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांची धाड; 81 शिश्या जप्त, आरोपीवर गुन्हा दाखल. बातमी:28/4/26 शेगाव (बु.) : भद्रावती तालुक्यातील आष्टा येथे अवैध देशी दारू साठवून विक्री करणाऱ्या इसमावर शेगाव (बु.) पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई 26 एप्रिल रोजी दुपारी करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे व पोलीस हवालदार संतोष निषाद हे परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, आष्टा येथील शरद मारोती पेटकुले (वय 44) हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह आरोपीच्या घरी धाड टाकली. पंचासमक्ष घराची झडती घेतली असता हॉलमधील एका कोपऱ्यात प्लास्टिकच्या पिशवीत 81 नग देशी दारूच्या सिलबंद शिश्या (प्रत्येकी 90 मि.ली.) आढळून आल्या. या दारूची किंमत सुमारे 3,240 रुपये असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडे दारू बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी पंचासमक्ष दारू जप्त केली. नमुना शिशी सील करून तपासासाठी ठेवण्यात आली. या प्रकरणी शरद मारोती पेटकुले याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर...

वरोरात भव्य ऑल इंडिया कॅरम स्पर्धेचे आयोजन, लाखो रुपयाचे बक्षिसे .

वरोरात भव्य ऑल इंडिया कॅरम स्पर्धेचे आयोजन, लाखो रुपयाचे बक्षिसे .

वरोरा (जि. चंद्रपूर), दि. १२ मार्च: इंडिया कॅरम क्लब, वरोरा तर्फे येत्या २२, २३, २४ व २५ मार्च रोजी भव्य ऑल इंडिया कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सिद्धिविनायक सभागृह, पोलीस स्टेशन समोर, वरोरा (नागपूर-चंद्रपूर महामार्गालगत) येथे पार पडणार आहे. दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केल्या जाते.

स्पर्धेत सिंगल व डबल अशा दोन्ही गटांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सिंगल गटात प्रथम क्रमांकास ३१,००१ रुपये, द्वितीय क्रमांकास १५,००१ रुपये , तृतीय क्रमांकास ७,००१ रुपये  देण्यात येतील.

डबल गटात प्रथम क्रमांकास ४१,००१ रुपये (मा.सौ. अर्चना आशिषभाऊ ठाकरे, नगराध्यक्षा, स्व. बाबाजी खापने स्मृतीप्रित्यर्थ मा.श्री. जगदीश खापणे, मा.सौ. लिना संजय गयनेवार यांचेतर्फे), द्वितीय क्रमांकास २५,००१ रुपये (स्व. अभय मेश्राम स्मृतीप्रित्यर्थ मा.श्री. भारत नेरकर, मा.श्री. मनीष जेठानी, मा.श्री. कुणाल रुयारकर, मा.श्री. गजानन जीवतोडे, मा.श्री. भरत तेला यांचेतर्फे), तृतीय क्रमांकास ११,००१ रुपये (मा.श्री. कासिफ खान, मा.श्री. प्रविण काकडे यांचेतर्फे) अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. तसेच मा.श्री. अक्षय सोनटक्के यांचेतर्फे सर्व आकर्षक चषक (शिल्ड) प्रदान करण्यात येतील.

या स्पर्धेसाठी प्रवेश फी सिंगलसाठी ५०० रुपये तर डबलसाठी १००० रुपये आहे. आसिफ शेख यांच्या वतीने खुले ते शेवट या विशेष बक्षीसाची रक्कम ११०१ रुपये आहे.

बाहेरगावच्या खेळाडूंसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात येईल. अशा खेळाडूंनी २२ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत स्पर्धास्थळी हजर राहणे आवश्यक आहे. सर्व सामने २९ पॉइंटचे खेळविण्यात येतील. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी आसिफ शेख (९९६०४९८०१३), शैलेंद्र समर्थ (९७६३१०७४१५) किंवा रमेश कुराडे (९९२१८१७८५४) यांच्याशी संपर्क साधावा.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पंच समिती तसेच अनेक पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत. आयोजकांनी सर्व क्रीडाप्रेमींना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

 येथील इंडिया कॅरम क्लबच्या  कार्यकारिणीने येत्या कॅरम स्पर्धेच्या आयोजनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. क्लबचे मार्गदर्शक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत स्पर्धा सुरळीत व उच्च दर्जाची पार पाडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे.

क्लबच्या मार्गदर्शक वरिष्ठांमध्ये सर्वश्री परागभाऊ बोरा, राजूभाऊ बोरा, यादवभाऊ घ्यार, शम्मीमामू, विजयभाऊ रुयारकर, नरेशभाऊ बोरा, नरेशभाऊ कुंभारे, संजय भोले आणि जितुभाऊ बैद यांचा समावेश आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणीने कंबर कसली आहे.

कार्यकारिणीचे अध्यक्ष म्हणून ओमप्रकाश जाधव तर सचिवपदी कन्हैया वरूटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्ष करीम शेख आणि कोषाध्यक्ष रशीद शेख यांच्यासह सदस्यांची एक भक्कम फळी तयार करण्यात आली आहे.

सदस्यांमध्ये संजय भोळे, भरत नेरकर, चंदू गिलगिलवार, रमेश कुराडे, करीम शेख, जिशान कुरेशी, रशिद शेख, ओमप्रकाश जाधव, समिर पाटील, वैभव मेश्राम, ललीत आत्राम, राजू खेकारे, ताराचंद मेश्राम, कन्हैया वरूटकर, अमन कुराडे, आशीष निखाडे, इसटाईल शेख, घनश्याम आंबुरकर, शैलेंद्र समर्थ, सुनील निमजे, गणवीर, कुणाल मजगवळी, सनी डाखोरे, रवि नंदनवार, अजय ठेंगणे, अब्दुल शेख, अफरोज शेख, मिलींद सुसणकर, के. के. कटारे, चंद्रशेखर सावलीकर, भूषण नरडे, संदीप बावणे, आशु आत्राम, मयुर पेंदाम, ओम पेंदाम, दर्श मेश्राम, पवन उईके, शकिल नागभिडकर, पवन अंड्रस्कर, अब्दुल भाई, देवा डोंगरे, रमजु शेख, सोमा, सुनिल भडकरे, प्रदिप कातोरे, विशाल यादव, दिलीप रुयारकर, विजय जाधव, राजु रुईरकर, रवि येटे, आसिफ मटरू, संदिप दाते, रितेश झाडे, सुरज नाडा, मेहमुद शेख, आरीफ शेख, निलेश सोनटक्के, रेहान शेख, गणेश वांढरे, कुणाल दिगदेवतुलवार, रोहन रुईकर, जितु दांडेकर, सोपान, वैभव आंबुरकर, शुभम पीठे, सुमित, कुणाल बरतलवार, निखील कचाटे, प्रभाव नागदेवे, हिमांशू व अभिजित नैताम यांच्यासह अनेक खेळाडू व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कार्यकारिणीच्या या सर्व सदस्यांनी कॅरम स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. खेळाडूंमध्ये या स्पर्धेबद्दल उत्साहाचे वातावरण असून योग्य नियोजन व व्यवस्थापनासाठी कार्यकारिणी जीवाचे रान करत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून वरोरा शहरातील कॅरम खेळाच्या विकासाला चांगली चालना मिळणार आहे.

Comments