वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

स्वच्छतेचा संदेश: नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी उचलली कचरामुक्तीची मोहीम

स्वच्छतेचा संदेश: नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी उचलली कचरामुक्तीची मोहीम

वरोरा, दि. १८ मार्च – 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान २०२५-२६' अंतर्गत वरोरा नगर परिषदेच्या वतीने आयोजित विशेष स्वच्छता मोहिमेत नगराध्यक्ष अर्चना ठाकरे आणि नगरसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला.

बुधवारी सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि तलाव परिसरात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष श्रीमती ठाकरे यांच्यासह नगरसेवकांनी हातात झाडू घेऊन परिसरातील कचरा साफ केला. विशेषतः शहराच्या मध्यभागी असलेले गांधी योग उद्यान आणि आजूबाजूच्या भागात स्वच्छता करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, "आपल्या शहराला सुंदर आणि आरोग्यदायी बनवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. केवळ प्रशासनच नाही, तर जेव्हा नागरिक आणि लोकप्रतिनिधी एकत्र येतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने शहराचा कायापालट होतो." स्वच्छता राखण्याची जबाबदारी नगरपालिकेवर जशी आहे तशीच येथील जनतेवर सुद्धा आहे त्यामुळे घरापुढील कचरा साफ ठेवण्याची विनंती त्यांनी केली यावेळी केली.

या मोहिमेत नगर परिषदेचे सदस्य तसेच 'गांधी उद्यान योग मंडळा'च्या सदस्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपले योगदान दिले.

नगराध्यक्ष श्रीमती ठाकरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानताना वरोरा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संकल्प सर्वांच्या सहकार्याने पुढे नेण्याचे आवाहन केले.

Comments