वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

स्त्रीशक्तीचा जयघोष, समानतेचा नवा प्रकाश!कोरपना येथे जागतिक महिला दिनानिमित्त 'महिला सन्मान सोहळा' उत्साहात संपन्न

स्त्रीशक्तीचा जयघोष, समानतेचा नवा प्रकाश!
कोरपना येथे जागतिक महिला दिनानिमित्त 'महिला सन्मान सोहळा' उत्साहात संपन्न

कोरपना (जि. चंद्रपूर), दि. १२ मार्च: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगर पंचायत कोरपना आणि युवा प्रतिष्ठान, कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'महिला सन्मान सोहळा' काल मोठ्या उत्साहात पार पडला. नगराध्यक्षा माननीय सौ. नंदाताई विजयराव बावणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर मध्यवर्ती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे होते. यावेळी व्यासपीठावर सुदर्शनजी निमकर, विजयराव बावणे, उत्तमराव पेचे (माजी सदस्य, जि.प.), नगराध्यक्षा नंदाताई बावणे, अशोक बावणे (सभापती, कृ.उ.बा.स.), सुरेश पा. मालेकार, उपनगराध्यक्ष इस्माईल शेख, प्रभाकर जि. गोडाम, भाऊजी चव्हाण, भारत चन्ने, पुंडलिक गिरसावळे, राहुल मालेकार, रसुल पटेल, जम्मु भाई, विवेक येरणे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर आणि बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांचा 'न्यू होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा' हा लोकप्रिय कार्यक्रम. तसेच लकी-ड्रॉच्या माध्यमातून उपस्थित महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यामुळे उपस्थित माता-भगिनींमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले.

परिसरातील मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. महिलांचा सन्मान करणे म्हणजे समाजाच्या प्रगतीला चालना देणे असा संदेश देणारा हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments