वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वरोरा वाळूघाट हत्याकांड: १२ आरोपींना न्यायालयीन कोठडी, पोलिसांवर हल्ल्याचा आरोप

वरोरा वाळूघाट हत्याकांड: १२ आरोपींना न्यायालयीन कोठडी, 
पोलिसांवर हल्ल्याचा आरोप.

महसूल विभागाचे कमालीचे दुर्लक्ष, महसूल मंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज. 


वरोरा (10/3/2026) : वर्धा नदीच्या बामर्डा वाळूघाटावर  भरत नागपाल यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व १२ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत (एमसीआर) पाठवले आहे. यापैकी चार आरोपींनी पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप केल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

एक मार्च रोजी वाळू घाटावर थकबाकीच्या वादातून झालेल्या हिंसक हल्ल्यात भरत नागपाल यांचा मृत्यू झाला होता.  वाळू व्यवसायिक पंकज वानखेडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १२ जणांविरुद्ध भादंविच्या विविध कलमांसह गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमोल रामचंद्र कामडी, सौरभ दिलीपसिंग ठाकूर, अक्षय विजयराव खडसे, उदय भास्कर वांदिले, अतुल पुरुषोत्तम मोटघरे, सुनील नारायण ढोरे, प्रफुल्ल सूर्यभान उमाटे, नितीन यशवंत कामडी, अजय उर्फ गोलू दिपसिंग इरपाचे, प्रकाश शंकर कासारे, प्रविण कवडुजी वासेकर आणि गितेश सातपुते यांचा समावेश आहे.

या सर्व आरोपींना जिल्हा न्यायालय 1 व अतिरिक्त सत्र न्यायालय यांच्या कोर्टात हजर केले असता न्यायाधीशांनी  पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर सोमवार त्यांना पुन्हा (९ मार्च) त्यांना पुन्हा न्यायालयासमोर उभे करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आठ आरोपींना थेट न्यायालयीन कोठडीत पाठविले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भारतीय न्याय संहिता (बीएनएस) ची कलमे:
· कलम १०*(१) - (संभवतः: खुनाच्या प्रयत्नाशी संबंधित)
· कलम १०९(१) - (दंगल करणे)
· कलम १८९(४) - (बेकायदेशीर जमाव)
· कलम १९० - (दुखापत करणे)
· कलम १९१(*) - (गंभीर दुखापत करणे)
· कलम १९२ - (खून)
· कलम २४(५) - 
· कलम १२६(२) - (बेकायदेशीर अडथळा किंवा मारहाण)
इतर कायदा:
· महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का - MCOCA)


मात्र, आरोपी अमोल कामडी, सौरभ ठाकूर, अक्षय खडसे आणि उदय वांदिले या चौघांनी न्यायालयात तक्रार केली की, पोलिस कोठडीत असताना पोलिसांनी त्यांच्यावर लॉकअपमध्ये मारहाण केली. या आरोपानंतर न्यायालयाच्या आदेशावरून या चारही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर या चार आरोपींनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. अशाप्रकारे या प्रकरणातील सर्व १२ आरोपींना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के करत आहेत.

बामर्डा हत्याकांड प्रकरणात दोन्ही गटापैकी एका गटातील बारा लोकांना न्यायालयीन कोठडी सुनावणीत आली. हा वाद दोन गटात असताना एका गटाला झुकते माप देण्यात आले का? असा थेट सवाल जनतेकडून करण्यात येत आहे. या वादातील ४ फोर व्हीलर तुटलेल्या अवस्थेत तीन जेसीपी  पोलीस स्टेशन येथे जमा आहेत. त्यातही या प्रकरणात  काही प्रश्न अजूनही अनोत्तरीच आहे.

बामर्डा घाटावरील सीसीटीव्ही फुटेज अजून पर्यंत आले नाही. या ठिकाणी घाट असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज असायला पाहिजे व  तसे ते बंधनकारक आहे. 

खरा वाद दोघांच्या पैशाचा होता की अवैध वाळू उत्खनन करण्याचा कारण बामर्डा घाटातील वाळू मागच्याच2025 वर्षात खोदून काढण्यात आली होती. महसूल अधिकाऱ्यांनी परमिशन कशी दिली. कोणत्या ठिकाणची दिली होती

या घाटामध्ये पोकलँड , जेसीबी, ट्रक, बोटि असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे रात्री वाळू खोदकाम सुरू होते. आणि ही घटना संध्याकाळच्या  सुमारास घडल्याची माहिती आहे. दोन्ही गटातील हे साहित्य कोणत्या गटाचे आहे. असे बरेच प्रश्न अनुत्तरीत आहे.

नागपाल यांना मारल्यानंतर सर्वजण पळून गेले असे सांगण्यात आले आहे. तर जेसीबी वर डिझेल टाकून कोणी जाळले. 
नदीमध्ये रस्ता बांधने, नदीचा प्रभाव वळवने महसूल अधिकाऱ्यांना दिसले नाही का. कारण नदी मधोमध अडवून त्यांना मारण्यात आले असा उल्लेख आहे.

हे सर्व गेल्या कित्येक दिवसापासून या घाटामध्ये सुरू असलेले काम वरोरा येथील महसूल अधिकाऱ्यांना, व संबंधित विभागाला  त्यांच्या कर्मचाऱ्यांला दिसले नाही का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून महसूल मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
..........................................

Comments