वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वरोरा येथे शिवजयंती उत्सवात शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप

वरोरा येथे शिवजयंती उत्सवात शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप

वरोरा, ता. [6/3/2026] : शिवसेना तालुका व युवा सेना शाखा, वरोरा यांच्या वतीने उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्थानिक मालवीय शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते होते. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख आलेख रठे, शहर प्रमुख युवासेना चेतन सातपुते, सुभाष कुरेकर, सौरभ टाले, सागर नरशिट्टीवार, अनिकेत राजूरकर, अविनाश निबरट, वेदांत गजबंदे, कपाटे यांच्यासह मोठ्या संख्येने युवासैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना नितीन मत्ते यांनी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार करून समाजात चारित्र्य, पराक्रम आणि स्वाभिमानाची जोपासना करण्याचे आवाहन केले. शालेय विद्यार्थ्यांना मदत करणे म्हणजे भविष्यातील नागरिकांसाठी केलेली गुंतवणूक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायपूते यांनी केले तर आभार प्रदर्शन टाले यांनी केले. या उपक्रमामुळे शहरातील तरुणाईमध्ये शिवजयंतीचा उत्साह संचारला असून समाजोपयोगी कार्याची भावना अधिक दृढ झाली आहे.

Comments