वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2026–27 : विकासाभिमुख व सर्वसमावेशक– मा. आमदार करण संजय देवतळे

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2026–27 : विकासाभिमुख व सर्वसमावेशक
– मा. आमदार करण संजय देवतळे

महाराष्ट्र राज्याचा सन 2026–27 चा अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासाला गती देणारा, दूरदृष्टीचा व लोककल्याणाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार श्री. करण संजय देवतळे यांनी व्यक्त केली 
या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील शेतकरी, महिला, युवक, कामगार, तसेच ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करण्यात आला असून राज्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. शेती व शेतकरी यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केली असून  कर्ज माफी समितीने केलेल्या शिफारशीनुसार दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पिक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे. 
महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा व रोजगार निर्मिती यांसाठी करण्यात आलेल्या विविध योजनांमुळे समाजातील सर्व घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्यास हा अर्थसंकल्प निश्चितच मदत करणारा आहे. राज्यातील पायाभूत सुविधा, रस्ते, दळणवळण, उद्योग व गुंतवणूक वाढीसाठी सरकारने केलेल्या आर्थिक तरतुदींमुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. हा अर्थसंकल्प केवळ आर्थिक तरतुदींचा दस्तऐवज नसून “समृद्ध, सक्षम प्रगत महाराष्ट्र” घडविण्याचा सरकारचा ठोस संकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे राज्यातील युवकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
याप्रसंगी मा. आमदार देवतळे यांनी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि संपूर्ण राज्य सरकारचे अभिनंदन करून हा लोकहिताचा, विकासाभिमुख व सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचे नमूद केले.

........

Comments