संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के

संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के वरोरा, दि. १६ एप्रिल: येथील संस्कार भारती पब्लिक स्कूलने यंदाच्या शैक्षणिक सत्रातील परीक्षेत तालुकास्तरावर आपला दबदबा कायम राखत १०० टक्के निकालाची नोंद केली आहे. शाळेची ही कामगिरी उल्लेखनीय ठरली असून विद्यार्थिनी अदिती गायकवाड हिने तब्बल ९६.०० टक्के गुण प्राप्त करून वरोरा तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी एकूण ९० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी सर्वच्या सर्व ९० विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला असून शाळेचा निकाल १००% लागला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये तब्बल २५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य (डिस्टिंक्शन) मिळवत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. शाळेच्या वतीने अदिती गायकवाड हिचा विशेष सत्कार करण्यात येणार असून तिच्या यशामुळे संपूर्ण वरोरा परिसरात शाळेचे ...

चंद्रपूरचा सांस्कृतिक इतिहास: 'महालावणी'मध्ये ५००० महिलांच्या लावणीने मोडला गिनीज विक्रमया अभूतपूर्व सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

चंद्रपूरचा सांस्कृतिक इतिहास: 'महालावणी'मध्ये ५००० महिलांच्या लावणीने मोडला गिनीज विक्रम

या अभूतपूर्व सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

चंद्रपूर, दि. २ (प्रतिनिधी): चंद्रपूरच्या भूमीने आज सांस्कृतिक क्षेत्रात नवा इतिहास रचला. 'उत्कृष्ट महिला मंच' आयोजित 'महालावणी' सोहळ्यात तब्बल ५००० रणरागिणींनी एकाच वेळी लावणी सादर करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल चंद्रपूर शहराचे नाव आता 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.

चांदा क्लब मैदानावर आयोजित या ऐतिहासिक सोहळ्यात जेव्हा हजारो घुंगरांचा एकच नाद घुमला, तेव्हा उपस्थित प्रत्येक चंद्रपूरकराचा ऊर अभिमानाने भरून आला. पारंपारिक लावणीच्या ठेक्यावर हजारो महिलांनी केलेल्या सादरीकरणाने वातावरण भक्तीमय आणि उत्साही झाले होते. हा क्षण केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून, स्त्रीशक्ती आणि लोककलेचा जागतिक विजय म्हणून पाहिला जात आहे.
या अभूतपूर्व सोहळ्याचे उद्घाटन चंद्रपूर मध्यवर्ती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती होती. उद्घाटक श्री. शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, "हे केवळ एक रेकॉर्ड नसून, महिला सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. आपली लोककला जपण्याचे मोठे काम या भगिनींनी केले आहे."

हा सोहळा यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांचे मार्गदर्शन लाभले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली तसेच माजी गृहराज्यमंत्री हंसराजभैय्या अहिर, माजी वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, चिमूरचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया, आमदार किशोरभाऊ जोरगेवार, आमदार करण देवतळे यांच्या प्रयत्नांनी चंद्रपूर जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाचा हा नवा इतिहास घडला, असे सांगितले जाते.
कार्यक्रमाची भव्यता आणि परिश्रम:
या विक्रमासाठी जवळपास ५००० महिला कलाकारांनी गेले अनेक दिवस सराव केला. वेगवेगळ्या वयोगटातील महिलांनी यात सहभाग घेतला. प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आज आनंद आणि समाधान होते. या कार्यक्रमासाठी अनेक नृत्य दिग्दर्शकांनी परिश्रम घेतले. अशा या ऐतिहासिक यशाबद्दल आयोजक छबुताई वैरागडे, सर्व नृत्य दिग्दर्शक आणि सहभागी ५००० कलाकार भगिनींचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. चंद्रपूर शहराने आज सिद्ध केले की, एकता आणि कलेच्या जोरावर जग गाठता येते.
**********

Comments