वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वामन चटप यांची विदर्भ राज्यासाठी 'स्वतंत्र विदर्भ राज्य ' आंदोलनाची हाक..वरोरा येथे चटप यांची भेट.

माजी आमदार वामन चटप यांची विदर्भ राज्यासाठी 'स्वतंत्र विदर्भ राज्य ' आंदोलनासाठी युवकांना हाक..

वरोरा येथे चटप यांची धावती भेट.

वरोरा/चेतन/१५/३/२६: विदर्भ राज्य निर्मितीसाठी ‘स्वतंत्र विदर्भ राज्य ' अंतर्गत मोठे आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, भाजपने २०१४ मध्ये विदर्भात मते मागूनही शिवसेनेच्या विरोधामुळे राज्य देण्याचे आश्वासन पाळले नाही. यापूर्वी काँग्रेसनेही विविध समित्यांच्या शिफारशी लागू न करता जनतेची फसवणूक केल्याचा आरोप चटप यांनी केला आहे.

गेल्या २० वर्षात विदर्भातील ४७ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि राज्यातील २ लाख ४७ हजार नोकऱ्यांचा अनुशेष लक्षात घेऊन हे आंदोलन बेरोजगारी व कुपोषण दूर करण्यासाठी आवश्यक असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी स्वतंत्र विदर्भ विषयावर वामनराव चटप यांच्याशी चर्चा करण्यात आली. युवकांनी हे आंदोलन हाती घ्यावे असे मत चटप यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र दिवाळखोरीत असून, येथे तरुणांना रोजगार मिळणार नसल्याने लवकरात लवकर विदर्भ राज्य निर्माण व्हावे, अशी मागणी करत आंदोलकांनी खासदारांना व आमदारांनी राजीनामे देऊन जनसंग्रामात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी आनंदवन चौक येथील कुकूले यांच्या प्रतिष्ठानात  चर्चा करण्यात आली. यावेळी स्वतंत्र विदर्भाचे साहित्य युवकांना वाटण्यात आले. युवकांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी व्हावे असे मत चटप यांनी व्यक्त केले. 

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, डॉक्टर सागर वजे, समीर बारई, पंकज नौकरकार, अनिल पाटील, बाबा आगलावे, समीर हक्के  उपस्थित होते.

Comments