वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

मध्यमवर्गीय गृहकर्जदारांना २.५० लाखांची सबसिडी तात्काळ द्या; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

: मध्यमवर्गीय गृहकर्जदारांना २.५० लाखांची सबसिडी तात्काळ द्या; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

चंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत मध्यमवर्गीय (एमआयजी) गृहकर्जदारांना देय असलेली ₹ २.५० लाखांची ‘क्रेडिट लिंक्ड सबसिडी’ तात्काळ वितरित करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारकडे जोरदारपणे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय आवासन व शहरी कार्य मंत्री मनोहर लाल यांना एक पत्र पाठवून चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो पात्र लाभार्थ्यांची प्रलंबित सबसिडीबाबत लक्ष वेधले आहे.

खासदार धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, २०१७ ते २०२१ या कालावधीत बँकांकडून गृहकर्ज घेतलेल्या अनेक पात्र मध्यमवर्गीय लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत अपेक्षित सबसिडी मिळालेली नाही. ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ या संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, अनेक वर्षे उलटूनही ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने कर्जदारांवर २.५० लाख रुपयांच्या अतिरिक्त मुद्दलाचा तसेच त्यावर वाढत असलेल्या व्याजाचा मोठा आर्थिक बोजा पडत आहे. यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.

ही बाब गंभीर असल्याचे सांगत खासदार धानोरकर यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पात्र लाभार्थ्यांचे तांत्रिक कारणास्तव किंवा निधीअभावी प्रलंबित असलेले अर्ज त्वरित मंजूर करून त्यांना सबसिडीची रक्कम वितरित करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे. या उपाययोजनेमुळे शेकडो कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Comments