आष्टा येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांची धाड; 81 शिश्या जप्त, आरोपीवर गुन्हा

आष्टा येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांची धाड; 81 शिश्या जप्त, आरोपीवर गुन्हा दाखल. बातमी:28/4/26 शेगाव (बु.) : भद्रावती तालुक्यातील आष्टा येथे अवैध देशी दारू साठवून विक्री करणाऱ्या इसमावर शेगाव (बु.) पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई 26 एप्रिल रोजी दुपारी करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे व पोलीस हवालदार संतोष निषाद हे परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, आष्टा येथील शरद मारोती पेटकुले (वय 44) हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह आरोपीच्या घरी धाड टाकली. पंचासमक्ष घराची झडती घेतली असता हॉलमधील एका कोपऱ्यात प्लास्टिकच्या पिशवीत 81 नग देशी दारूच्या सिलबंद शिश्या (प्रत्येकी 90 मि.ली.) आढळून आल्या. या दारूची किंमत सुमारे 3,240 रुपये असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडे दारू बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी पंचासमक्ष दारू जप्त केली. नमुना शिशी सील करून तपासासाठी ठेवण्यात आली. या प्रकरणी शरद मारोती पेटकुले याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर...

बहिरम बाबा चषक २०२६ चा थाटात पारितोषिक वितरण सोहळा; रवींद्र शिंदे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

: बहिरम बाबा चषक २०२६ चा थाटात पारितोषिक वितरण सोहळा; रवींद्र शिंदे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

घुग्घूस (जि. चंद्रपूर), दि. २ मार्च: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस शहराचे कुलदैवत बहिरम बाबा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित बहिरम बाबा चषक २०२६ स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. बहिरम बाबा देवस्थान समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर मध्यवर्ती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे हे उपस्थित होते.

यावेळी अतिथींच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या संघाला चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रघुवीरजी हसराजभैय्या अहिर, भाजपा तालुकाध्यक्ष विनोदजी केवले, प्रज्वलजी किशोरभाऊ जोरगेवार आणि नकुल शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याने कुलदैवताच्या भक्तीबरोबरच क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांनाही चालना मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Comments