"न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे अभियंत्याविरुद्ध शासकीय जमिनीवरील अवैध उत्खनन प्रकरणी गुन्हा दाखल; १.५१ कोटींचा दंड ठोठावला असतानाही अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप"

"न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे अभियंत्याविरुद्ध शासकीय जमिनीवरील अवैध उत्खनन प्रकरणी गुन्हा दाखल; १.५१ कोटींचा दंड ठोठावला असतानाही अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप" वरोरा, जि. चंद्रपूर : रेल्वेच्या सहायक कार्यकारी अभियंता अधिकाऱ्यासह अन्य अधिकाऱ्यांविरोधात सरकारी जमिनीवरील अवैध मुरूम उत्खनन व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते  विनोद खोब्रागडे यांनी केलेल्या फिर्यादीनंतर ही कारवाई झाली आहे. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सुविधा पांडे/यावलकर यांनी ८ एप्रिल २०२६ रोजी हा आदेश पारित केला. त्यानुसार वरोरा पोलिस ठाण्यात २३ एप्रिल २०२६ रोजी प्रथम खबर अहवाल (एफआयआर क्र. ०५३७/२०२६) नोंदविण्यात आला. फिर्यादीत आरोपी क्रमांक १ ते १२ अशा एकूण १२ जणांचा उल्लेख असला, तरी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान फिर्यादीने काही आरोपींचे नाव वगळल्याने सध्या हा गुन्हा प्रामुख्याने आरोपी क्रमांक १ — सहायक कार्यकारी अभियंता सिद्धार्थ गुप्ता (वय ५५, रेल्वे विभाग, वरोरा) यांच्याविरोधात दाखल आहे. फिर्यादीत म...

नागपुरात अत्याधुनिक ‘नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट’चे भूमिपूजन; मध्य भारताला मिळणार जागतिक दर्जाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय

नागपुरात अत्याधुनिक ‘नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट’चे भूमिपूजन; मध्य भारताला मिळणार जागतिक दर्जाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय

नागपूर : प्रतिनिधी
मध्य भारतातील आरोग्य सेवेला नवे बळ देणाऱ्या अत्याधुनिक ‘नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट’ या मल्टीस्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीचा शुभारंभ भूमिपूजन सोहळ्याने झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
धरमपेठ येथील नॉर्थ अंबाझरी मार्गावर डॉ. आबाजी थत्ते सेवा अनुसंधान संस्थेच्या वतीने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. या वेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी, संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, सचिव शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुमारे ४६१ बेड क्षमतेचे हे रुग्णालय २३ मजली सुसज्ज इमारतीत उभारले जाणार असून हेलिपॅड आणि एअर ॲम्बुलन्ससारख्या आधुनिक सुविधांनी ते सुसज्ज असेल. सुमारे पाच लाख चौरस फूट क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या या संस्थेत अत्याधुनिक उपचारांसह अवयव प्रत्यारोपण, बर्न वॉर्ड, हृदयविकार, न्यूरोलॉजी, नेफ्रॉलॉजी, युरोलॉजी, क्रीडा वैद्यक, प्लास्टिक व पुनर्रचना शस्त्रक्रिया अशा विविध सुपर स्पेशालिटी सेवा उपलब्ध होणार आहेत. विशेषतः अवयव प्रत्यारोपण सुविधेवर विशेष भर दिला जाणार आहे.
याशिवाय या संस्थेत पदव्युत्तर व सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, आरोग्य सेवेसोबतच वैद्यकीय शिक्षणालाही चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे नागपूरसह संपूर्ण मध्य भारतातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

.................

Comments