चिमूर चंद्रपूर बस चा अपघात, एक मृत्यू 18 जखमी.राजुरा रहिवासी वाहकाचा एसटी बस अपघातात मृत्यू, १८ जखमी

चिमूर चंद्रपूर बस चा अपघात, एक मृत्यू 18 जखमी.

राजुरा रहिवासी वाहकाचा एसटी बस अपघातात मृत्यू, १८ जखमी  

चंद्रपूर (वरोरा)
चेतन लूतडे 

 चिमूर ते चंद्रपूर जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस क्रमांक **Mh40 AQ 6181** चा मंगळवारी ईरई नदीजवळ अपघात झाला. यात **सुरेश भटारकर** (वाहक, राजुरा रहिवासी) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर १८ प्रवाशी जखमी झाले आहे. 

 घटनेचे तपशील:  
- **ठिकाण**: चारगाव बुद्रुक ते चारगाव खुर्द यामधील (वरोरा)  ईरई नदीच्या पहिल्या पुलाच्या वळणावर हा अपघात दुपारी दोन वाजताच्या सुमारास  घडला.  

चिमूर चंद्रपूर या बसचे चालक सुरेश  पूसनाके** (३७) यांनी वरोराच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्सला साईड देताना ईरइ नदीच्या वळणावर बसचे नियंत्रण गमावल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रतिनिधीशी बोलताना चालकांनी दिली. 
- बस सुमारे ७-८ फूट खोल जागेवर कोसळून  पडल्याने वाहक सुरेंश भटारकर  यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बसमध्ये  सुमारे २५ प्रवासी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सर्व १८ जखमींना व मृतकाला  प्रथम उपजिल्हा रुग्णालय, वरोरा* येथे दाखल करण्यात आले.  
डॉक्टरांच्या तपासणीअंती  भटारकर यांना मृत घोषित केले. 

- त्यापैकी **६ गंभीर रुग्णांना** चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  

#### चौकशी आणि पुढील कारवाई:  
वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी न्याय्य तपास सुरू केला आहे. बसची गती, रस्त्याची स्थिती आणि चालकाची तांत्रिक कुशलता यावर प्रकाश टाकणारी चौकशी अंतिम निष्कर्षापर्यंत सुरू राहील.  

 स्मिता सुतवणे , विभाग नियंत्रक राज्य परिवहन चंद्रपूर विभाग  घटना घडतात उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथ भेटण्यासाठी पोहोचले. किरकोळ जखमींना 500,गंभीर जखमींना 1000 रुपये , व अंत्यविधीसाठी पाच हजार रुपये तात्काळ देण्याचे विभागाकडून ठरली आहे. 
यानंतर पी फॉर्म भरल्या नंतर झालेला खर्च देण्यात येईल. प्रवाशांकडे तिकीट आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 
*****************
ड्रायव्हरच्या चुकीमुळे हा अपघात झालेला आहे तरी जखमींना तात्काळ बस महामंडळाने आर्थिक मदत द्यायची मागणी माजी सभापती राजू चिकटे यांनी केली आहे.
या अपघातात जखमी रुग्णांची नावे 
रेखा श्रीरामे , सुमन बालूदे, कांताबाई नवले, श्याम कला दडमल, भरत चिंचोलकर, वनिता दडमल, मधुकर चिंचोळकर, मालती कापसे, शकील शेख, शाहीन शेख, वासुदेव शेडमाके, वसंत देठे, सोनाबाई चिंचोलकर ईश्वर चिंचोळकर, स्नेहा वारजूरकर, संजय कोवे, आंबेडकर  सदाशिव मून,चालक  सुरेश पूसनाके.
वाहक सुरेश भटारकर राहणार राजुरा यांचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू.
******************************

Comments