प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

वरोरा येथील एका तरुणाने स्वतःला पंतप्रधान म्हणवत पोलिसांकडे केली दमदार मागणी!

वरोरा येथील एका तरुणाने स्वतःला पंतप्रधान म्हणवत पोलिसांकडे केली दमदार मागणी!

महादेव आसेकर यांची वरोऱ्यात चर्चा.

वरोरा दि. 26 फेब्रुवारी २०२६: एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वरोरा येथील रहिवासी असलेल्या महादेव गुलाबराव आसेकर या तरुणाने स्वतःला भारताचा पंतप्रधान असल्याचे सांगत पोलिसांकडे एक विलक्षण मागणी केली आहे. या संबंधात वर्तमानपत्रात वार्ता आल्याने महादेव आसेकर यांची चर्चा संपूर्ण परिसरात केली जात आहे.

आपण नुकतेच पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याचे त्यांनी नमूद करत, श्री. आसेकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाला एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी पंतप्रधान म्हणून मिळणारे प्रमाणपत्र आणि अंगरक्षक व पिस्तूल लगेच घरपोच उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. बऱ्याच दिवसापासून ही मागणी केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याबाबत त्यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार केली असली तरी, तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या अधिकाऱ्यांनी कर्तव्यात हयगय केल्याने त्यांना निलंबित करून त्यांच्या जागी  तंदूलकर यांची तात्काळ पोलीस निरीक्षक (ठाणेदार) म्हणून नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी आपल्या पत्रात केली आहे.

पोलिसांनी मात्र या पत्राची गंभीर दखल न घेता, ही एक प्रकारची मस्करी किंवा मानसिक अस्वस्थतेची लक्षणे असल्याचे सांगितले आहे. 

श्री. आसेकर यांनी पत्राच्या शेवटी 'पंतप्रधान (PM) भारत सरकार आणि 'सदेव आपल्या सेवेत' अशी स्वाक्षरी केली असून, त्यांची ही मागणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 
या युवकाजवळ फॉर्च्यूनर कंपनीची गाडी असून या गाडीवर पंतप्रधान असे लिहिल्याने  वरोरा शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.
.....................‌.‌

.     प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती 

विनोदभाऊ नंदुरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

.     पत्रकारांचे राज्यस्तरीय अधिवेशन वरोरा येथे पार पडले

Comments