एकोणा खाण परिसरात चहा पिताना वाद; लाठीहल्ल्यात ट्रकचालक जखमी

एकोणा खाण परिसरात चहा पिताना वाद; लाठीहल्ल्यात ट्रकचालक जखमी. कोळसा वाहनाचा नंबर लावण्यावरून वाद. खान प्रशासनाचे दुर्लक्ष वरोरा, ता. ११ एप्रिल : वरोरा येथील एकोणा माईन्स गेट क्रमांक दोन येथे काल सकाळी अकरा वाजता चहा पिताना झालेल्या वादातून तिघांनी ट्रकचालक सूर्यप्रतापसिंग कृष्णगोपाल सिंग (वय २५, रा. बिलघाडी, ता. गूनोर, जि. पन्ना, मध्यप्रदेश) यांच्यासह चार जणांवर लाठीने हल्ला केला. या हल्ल्यात सूर्यप्रतापसिंग यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, हाताला सूज आली आहे. पोलिसांनी मनोजकुमार चंद्रवंशी, सन्नीकुमार चंद्रवंशी व सहँदरकुमार बंशी या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम  ११८(१),(२), ३५१,३५२ व जीवे मारण्याच्या धमकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी सूर्यप्रतापसिंग यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आदल्या दिवशी सकाळी चार वाजता कोळसा वाहनाचा नंबर लावण्यावरून या आरोपींनी त्यांच्या साथीदार विवेक हरीसिंग याला मारहाण केली होती. ती बोलण्यासाठी सूर्यप्रतापसिंग हे आपल्या चार साथीदारांसह गेले असता, आरोपींनी कोणतीही चौकशी न करता हातातील लाकडी दांड्या...

फटाके फोडण्यास मनाई केल्याच्या कारणावरून आशीर्वाद मंगल कार्यालयात मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल


फटाके फोडण्यास मनाई केल्याच्या कारणावरून आशीर्वाद मंगल कार्यालयात मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

वरोरा, ता. ११ एप्रिल : वरोरा येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे लग्नाच्या वरातीत फटाके फोडण्यास मनाई केल्याच्या कारणावरून वरातीतील आठ जणांनी २० वर्षीय शाहीद इरफान रंगरेज व त्यांच्या दोन साथीदारांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींची नावे उघड करीत त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११५(२) (मारहाण), १८८(२), १९०  अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

लग्न कार्यालयात आलेल्या वरातीमध्ये
१) जामेश अब्दुल हारून शेख (रा. चंद्रपूर)
२) शेख रहेमत शेख अहमद (रा. बल्लारशा)
३) शेख काशीफ शेख साजीद (रा. अमरावती)
तसेच इतर ४ ते ५ अज्ञात वराती लग्नकार्यासाठी आशीर्वाद मंगल कार्यालय, वरोरा येथे आले होते. वरात मंगल कार्यालयाच्या गेट जवळ आल्यानंतर फटाके फोडून आनंद साजरा करत होते. 

यादरम्यान फिर्यादी शाहीद इरफान रंगरेज यांनी शेजारी दिलीप पाडवे यांच्या तक्रारीनंतर वरातीतील लोकांना फटाके फोडल्याने होणाऱ्या त्रासाबाबत समजावले. पण ते समजण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यामुळे वराती मधील लोकांनी रागाच्या भरात शाहीद यांना गाडीवर फेकून मान, पाठ, पोट, कान व डोळ्यांखाली मारहाण केली. नंतर र्ऑफिसमध्येही पुन्हा मारहाण केली. तसेच स्वयंपाकघरातील कर्मचारी विजय मेश्राम यालाही मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज जप्त केला आहे. फिर्यादीच्या वैद्यकीय अहवालात जखमांची नोंद आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू असून, वरोरा पोलीस पुढील कारवाई करीत आहे.
.............

Comments