वरोर्यासाठी लवकरच नवी पाणीपुरवठा योजना ; आमदार करण देवतळे यांच्याकडून विकासकामांचा आढावा

वरोर्यासाठी लवकरच नवी पाणीपुरवठा योजना ; आमदार करण देवतळे यांच्याकडून विकासकामांचा आढावा वरोरा, दि. २० एप्रिल २०२६: वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांनी आज नगर परिषद वरोरा येथे एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करून शहराच्या विकासाच्या दृष्टीने भरीव पाऊल उचलले. या बैठकीत आमदार देवतळे यांनी वरोरा शहराच्या पाणीपुरवठा योजनेला लवकरच मूर्त स्वरूप दिले जाणार असल्याची ग्वाही दिली. तसेच आमदार निधी व इतर स्त्रोतांमधून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. बैठकीत शहरवासीयांच्या दैनंदिन सुविधांशी संबंधित अनेक ज्वलंत मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण, वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजना, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरळीत पाणीपुरवठा करणे, नाल्यांची नियमित स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची देखभाल व स्वच्छता तसेच एकूणच शहर स्वच्छता अभियान अधिक प्रभावी करण्याबाबतच्या ठोस नियोजनावर चर्चा झाली. नागरिकांना मूलभूत सुविधा सक्षमपणे व सुलभपणे मिळाव्यात तसेच शहरातील प्रलं...

अनोळखी इसमाला लिफ्ट देणे महागात पडले.गाडी मोबाईल घेऊन चोरटा पसार, वरोरा पोलीसात तक्रार दाखल

अनोळखी इसमाला लिफ्ट देणे महागात पडले.

गाडी मोबाईल घेऊन चोरटा पसार, वरोरा पोलीसात तक्रार दाखल .

वरोरा, दि. २० एप्रिल २०२६: शहरातील बोर्डा चौक परिसरात एका धनगर युवकाला दारू पाजल्यानंतर त्याची मोटरसायकल आणि मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याची पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भादंवि कलम ३०३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश सुरेश आस्कर (वय ३८, रा. डोंगरगाव खडी, ता. भद्रावती) हे व्यापारी मजूर आहेत. दिनांक १९ एप्रिल रोजी सायंकाळी ते आपल्या हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक (क्र. एम.एच. ३४ सी.ई. ५७३९) या मोटरसायकलवरून येत असताना त्यांनी कोंढा फाट्याजवळ एका अनोळखी व्यक्तीला वरोरापर्यंत लिफ्ट दिली.

वाटेत गप्पा मारताना त्या इसमाने स्वतःला मध्यप्रदेशचा रहिवासी असल्याचे सांगितले. त्याचा स्वभाव पटल्याने फिर्यादीने त्याला सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बोर्डा चौकातील देशी दारूच्या दुकानात दारूपिण्यासाठी नेले. गाडी दुकानासमोर लावून दोघेही दारू प्यायले. दारूचे पैसेही फिर्यादीनेच भरले.

थोड्याच वेळात आरोपीने फिर्यादीकडे मोबाईल फोन मागितला आणि "तुम्ही फळे घेऊन या, मी इथेच थांबतो" असे सांगत गाडीची चावी व मोबाईल स्वतःजवळ ठेवून घेतले. फिर्यादी प्रकाश आस्कर हे फळे घेण्यासाठी गेले आणि परत आले तेव्हा दुकानासमोर ना त्यांची गाडी होती ना तो अनोळखी इसम.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, सदर अनोळखी चोरट्याने सुमारे ३०,००० रुपये किमतीची जुनी वापरातील मोटरसायकल व ५,००० रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल असा एकूण ३५,००० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

---

Comments