अखेर रेल्वेचे सहा. कार्यकारी अभियंता विरुध्द गुन्हा दाखलअवैध रेती उत्खनन प्रकरण अंगलट आले.सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांची माहिती

अखेर रेल्वेचे सहा. कार्यकारी अभियंता विरुध्द गुन्हा दाखल अवैध रेती उत्खनन प्रकरण अंगलट आले. सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांची माहिती  चंद्रपूर   :   चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मौजा -डाहाळा (रिठ) येथील सर्व्हे नं. २३, आराजी २.८७ हे.आर. रेल्वेच्या मालकीची जमीन असतांना रेल्वेने ०.९३ हे.आर. मध्ये मुरुम काढण्यासाठी  जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडून दि. २० एप्रिल २०२१ रोजी परवानगी घेवून रु. २५,७६,४००/- स्वामीत्वधन भरले होते. त्याअर्थी रेल्वेच्या मालकीची त्याला लागुनच असलेली सर्व्हे नं. २४, आराजी ४.५७ हे.आर. (१२ एकर) ही जमीन मालकीची नसतांना सुद्धा सन २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे अधिकारी सिद्धार्थ गुप्ता यांनी अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन केले आहे.  व मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीची चोरी केली होती. याचा छडा लावत सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांनी पुराव्यासह फौजदारी केस दाखल केला. तसेच रेल्वे अधिकारी सिध्दार्थ गुप्ता यांच्यावर एफआयआर दाखल करुन सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने ८ एप्रिल २०२६ ला ...

वरोरा पोलिसांची कारवाई : अवैध दारुविक्री करताना

वरोरा पोलिसांची कारवाई :  तीन ठिकाणी अवैध दारुविक्रीचे पर्दाफाश, तिघेजण अटक, एकूण ५६ देशी बाटल्या वेगवेगळ्या ठिकाणी जप्त.

वरोरा, दि. १० – वरोरा पोलिसांनी गुप्त बातमीच्या आधारे शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून अवैध दारुविक्रीचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करून एकूण ५६ देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. सर्व कारवाई दि. ०९ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली.

अंबादेवी वार्ड : १७ बाटल्यांसह विपिन पाटील अटक
पोलीस हवालदार अमोल नवघरे, संदीप मुळे, प्रशांत नागोसे व पोलीस अंमलदार मनोज यांच्या पथकाने पेट्रोलिंग करत असताना मुखबिराकडून माहिती मिळाली की, अंबादेवी वार्डातील विपिन पाटील दारुविक्री करतो. पंचांच्या उपस्थितीत छापा टाकल्यानंतर आरोपी विपिन प्रभाकर पाटील (वय ४७) याच्याकडून १७ देशी बाटल्या (प्रत्येकी ९० मिली, एकूण ६८० रुपये) जप्त करण्यात आल्या. त्याच्यावर कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल.

सरदार पटेल वार्ड : १५ बाटल्यांसह शंकर देवकर अटक
दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी सरदार पटेल वार्डात छापा टाकून शंकर मुकुंद देवकर (वय २४) याला अटक केली. त्याच्याकडून १५ देशी बाटल्या (एकूण ६०० रुपये) जप्त करण्यात आल्या. त्याच्यावरही दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्डा : २४ बाटल्या, रोख व मोबाईलसह अशोक पंधराम अटक
तिसऱ्या कारवाईत पोलीस हवालदार संदीप मुळे यांच्या पथकाने मार्डा येथे वर्धा नदीकाठावर छापा टाकला. आरोपी अशोक भैय्याजी पंधराम (वय ३९) याच्याकडून २४ देशी बाटल्या (एकूण ९६० रुपये), २०० रुपये रोख व १२,५०० रुपयांचा मोबाईल असा एकूण १३,६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्धही कलम ६५(ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तीनही प्रकरणांत यांनी दारू कोणत्या दुकानातून विकत आणली याचा तपास पोलीस करीत आहेत. वरोरा तालुक्यात खेडेगावात देशी विक्रेते मोठ्या प्रमाणात वाढले असून याबाबत पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली आहे. मात्र अजून पर्यंत कोणत्याही मोठ्या दारू दुकानावर किंवा हॉटेलवर किंवा बिअर शॉपीच्या आत विना परवाना अवैध दारू विकत असल्याबाबत कारवाई झाल्याचे दिसत नाही हे विशेष.
............


Comments