अखेर रेल्वेचे सहा. कार्यकारी अभियंता विरुध्द गुन्हा दाखलअवैध रेती उत्खनन प्रकरण अंगलट आले.सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांची माहिती
अवैध रेती उत्खनन प्रकरण अंगलट आले.
सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांची माहिती
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मौजा -डाहाळा (रिठ) येथील सर्व्हे नं. २३, आराजी २.८७ हे.आर. रेल्वेच्या मालकीची जमीन असतांना रेल्वेने ०.९३ हे.आर. मध्ये मुरुम काढण्यासाठी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडून दि. २० एप्रिल २०२१ रोजी परवानगी घेवून रु. २५,७६,४००/- स्वामीत्वधन भरले होते. त्याअर्थी रेल्वेच्या मालकीची त्याला लागुनच असलेली सर्व्हे नं. २४, आराजी ४.५७ हे.आर. (१२ एकर) ही जमीन मालकीची नसतांना सुद्धा सन २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे अधिकारी सिद्धार्थ गुप्ता यांनी अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन केले आहे. व मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीची चोरी केली होती. याचा छडा लावत सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांनी पुराव्यासह फौजदारी केस दाखल केला. तसेच रेल्वे अधिकारी सिध्दार्थ गुप्ता यांच्यावर एफआयआर दाखल करुन सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने ८ एप्रिल २०२६ ला सिध्दार्थ गुप्ता यांच्यावर एफआयआर दाखल केला, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांनी श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
सदर प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीची करोडो रुपयांची चोरी झाली असतांना सुद्धा रेल्वे अधिकारी सिद्धार्थ गुप्ता यांचेवर गुन्हा दाखल केला नव्हता व दंडाची रक्कम सुद्धा आजपर्यंत महसुल प्रशासनाने वसुल केली नाही. त्यामुळे तलाठी विनोद खोब्रागडे यांनी संपुर्ण प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनास तक्रार दिली. परंतु, सदरहू तक्रारीची दखल संबंधीत पोलीसांनी घेतली नसल्यामुळे विनोद खोब्रागडे यांनी कोर्ट विद्यमान न्याय दंडाधिकारी, प्रथम श्रेणी, वरोरा यांच्या न्यायालयात दस्तऐवजांच्या पुराव्यासह फौजदारी केस नं. ३१२/२०२४ दाखल करुन स्वतः युक्तीवाद केला होता. सदरहू प्रकरणामध्ये रेल्वे अधिकारी सिद्धार्थ गुप्ता यांचेसह महसुल अधिकारी, जिल्हाधिकारी, चंद्रपूर, उ.वि.अ.वरोरा, तहसिलदार, वरोरा, नायब तहसिलदार , मंडळ अधिकारी, तलाठी, अव्वल कारकुन व पोलीस प्रशासन यांचे विरुद्ध प्रकरण दाखल केले होते. मात्र सदर प्रकरणातील मुख्य आरोपी रेल्वे अधिकारी सिद्धार्थ गुप्ता यांचेवर एफ. आय. आर. दाखल करुन सखोल चौकशी करण्याची मागणी विनोद खोब्रागडे यांनी केली होती. त्या मागणीच्या आधारे विद्यमान न्यायालयाने दि. ०८.०४.२०२६ रोजी आदेश पारित करुन सहाय्यक कार्यकारी अभियंता सिद्धार्थ गुप्ता यांचे विरुद्ध दि. ८ एप्रिल २०२६रोजी आदेश पारित करुन वरोरा पोलीसांना भारतीय न्याय संहिताच्या कलम ६१ (२), ३१६ (५), ३१८(४) ३३६(३) ३४०(१) (२) नुसार एफ.आय.आर. नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.
.........
Comments
Post a Comment