नागपुरात अत्याधुनिक ‘नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट’चे भूमिपूजन; मध्य भारताला मिळणार जागतिक दर्जाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय

नागपुरात अत्याधुनिक ‘नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट’चे भूमिपूजन; मध्य भारताला मिळणार जागतिक दर्जाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय नागपूर : प्रतिनिधी मध्य भारतातील आरोग्य सेवेला नवे बळ देणाऱ्या अत्याधुनिक ‘नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट’ या मल्टीस्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीचा शुभारंभ भूमिपूजन सोहळ्याने झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. धरमपेठ येथील नॉर्थ अंबाझरी मार्गावर डॉ. आबाजी थत्ते सेवा अनुसंधान संस्थेच्या वतीने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे. या वेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी, संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, सचिव शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुमारे ४६१ बेड क्षमतेचे हे रुग्णालय २३ मजली सुसज्ज इमारतीत उभारले जाणार...

वरोऱ्यात निष्काळजी वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई; रस्त्यात ऑटो उभे करून सोडणाऱ्या 5 चालकांविरुद्ध गुन्हे दाखल

वरोऱ्यात निष्काळजी वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई; रस्त्यात ऑटो उभे करून सोडणाऱ्या 5 चालकांविरुद्ध गुन्हे दाखल
वरोरा : प्रतिनिधी
शहरातील विविध चौकांमध्ये रस्त्याच्या मधोमध कोणतेही इशारे (इंडिकेटर/रिफ्लेक्टर) न लावता ऑटो उभे करून चालकांनी वाहन सोडून दिल्याच्या घटनांवर वरोरा पोलिसांनी कारवाई करत एकाच दिवशी पाच निष्काळजी चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकारांमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी पोहवा संदीप अनेराव हे विविध ठिकाणी फिक्स पॉईंट ड्युटीवर असताना या घटना उघडकीस आल्या.
🔹 आनंदवन चौक (सकाळी 10:30)
ऑटो क्र. MH-34-D-3170 रस्त्याच्या मधोमध उभा आढळला. चालक गजानन पांडुरंग भोयर (वय 50, रा. मालविय वार्ड) याच्याविरुद्ध कारवाई.
🔹 आनंदवन चौक (सायं. 4:40)
ऑटो क्र. MH-34-BH-2557 उभा करून सोडल्याप्रकरणी सुचित तोमेश्वर विरुटकर (वय 48, रा. मालविय वार्ड) याच्यावर गुन्हा.
🔹 आनंदवन चौक (सायं. 5:00)
ऑटो क्र. MH-34-BH-2574 प्रकरणात राकेश प्रभाकर आगलावे (वय 35, रा. खांजी वार्ड) याच्यावर कारवाई.
🔹 रत्नमाला चौक (सायं. 4:50)
ऑटो क्र. MH-34-BH-4382 रस्त्यात उभा ठेवून सोडल्याबद्दल सागर घणश्याम जांभुळे (वय 28, रा. बोर्डा) याच्यावर गुन्हा.
🔹 रत्नमाला चौक (सायं. 5:05)
ऑटो क्र. MH-34-BH-4579 प्रकरणात तुकाराम विठ्ठलराव शेंडे (वय 45, रा. कमला वार्ड) याच्यावर कारवाई.
या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित वाहनचालकांनी कोणतेही इशारे किंवा ओळखचिन्ह न लावता वाहन रस्त्याच्या मधोमध सोडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आणि अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहने बाजूला करून चालकांचा शोध घेतला.
सदर सर्व आरोपींविरुद्ध कलम 285 बीएनएस अंतर्गत गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, वरोरा पोलिसांकडून अशा निष्काळजी वाहनचालकांविरुद्ध पुढील काळातही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
...............


Comments