खूनाच्या आरोपीस ७ वर्षाचा सक्षम कारावास व दंड**खेमजई येथील घटना**आरोपीस आज सुनावली सजा*

* खूनाच्या आरोपीस ७ वर्षाचा सक्षम कारावास व दंड* *खेमजई येथील घटना* *आरोपीस आज सुनावली सजा*  वरोडा : ठेंगडी सर       जमिनीच्या वादातून पुतण्याने काकाचा खून केल्याच्या आरोपावरून पुतण्यास ७ वर्षाचा कारावास व वीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज 22 एप्रिल रोज बुधवार ला सुनावली.          घटनेची माहिती वरोडा तालुक्यातील खेमजई येथे कवडू झित्रा दडमल वय 60 वर्ष व यशवंत भाऊराव दडमल वय ३० वर्ष राहत होते. यांच्यात काका पुतण्याचे नाते होते. त्यांचा वडिलोपार्जित जागेवरून नेहमी वाद होत होता. आरोपी हा मृतकाला नेहमी जागेवरून टोमणे मारून,तू माझ्या पत्नीकडे का पाहतोस असे म्हणत सतत धमकी देत होता.       याच कारणावरून 12 एप्रिल 2021 ला सायंकाळी 7:45 च्या सुमारास आरोपी यशवंतने मृतक कवडू हा आपल्या दोन नातवंडासह घरात असतांना त्याचे डोक्यावर लाकडी टेणप्याने वार करून जखमी केले. मृतक जमिनीवर खाली पडला असतानाही त्याच टेणप्याने त्यास मारले असता कवडू दडमल हे मरण पावले.        मृतकाची पत्नी लिलाब...

आईवर होणाऱ्या छळाला कंटाळून मुलाने वडिलांवर जीवघेणा हल्ला

आईवर होणाऱ्या छळाला कंटाळून मुलाचा वडिलांवर जीवघेणा हल्ला

बातमी: चेतन लूतडे 22april26

वरोरा तालुक्यातील अर्जुनी (तुकुम) येथे कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली असून मुलानेच वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सौ. ठकाबाई मारोती दडमल (वय ६४) या आपल्या कुटुंबासह अर्जुनी (तुकुम) येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटुंबात पती मारोती दडमल (वय ७०) व चार मुले असून, दोन मोठे मुले वेगवेगळे राहतात तर संदीप व हरी हे आई-वडिलांसोबत राहतात.
पती मारोती दडमल हे पत्नीला वारंवार विनाकारण त्रास देत असल्याने घरात सतत वाद होत होते. यामुळे मुलगा संदीप व हरी हे वेळोवेळी वडिलांना समज देत होते.
दि. २० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास संदीप दडमल हा वरोरा येथून घरी परतल्यानंतर वडिलांशी वाद झाला. आईला का त्रास देता, असे विचारत त्याने संतापाच्या भरात घरातील लोखंडी सळई (सब्बल) घेऊन वडिलांच्या छातीवर वार केला. या घटनेत मारोती दडमल गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर संदीपनेच जखमी वडिलांना मोटारसायकलवरून प्रथम वरोरा येथील सरकारी रुग्णालयात नेले. तेथून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी आज सौ. ठकाबाई दडमल यांनी पोलीस स्टेशन शेगाव (बु.) येथे तक्रार दिली असून, मुलगा संदीप दडमल याच्याविरोधात  शेगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेगाव पोलीस करत आहेत.
.....

Comments