*खेमजई येथील घटना*
*आरोपीस आज सुनावली सजा*
वरोडा : ठेंगडी सर
जमिनीच्या वादातून पुतण्याने काकाचा खून केल्याच्या आरोपावरून पुतण्यास ७ वर्षाचा कारावास व वीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज 22 एप्रिल रोज बुधवार ला सुनावली.
घटनेची माहिती वरोडा तालुक्यातील खेमजई येथे कवडू झित्रा दडमल वय 60 वर्ष व यशवंत भाऊराव दडमल वय ३० वर्ष राहत होते. यांच्यात काका पुतण्याचे नाते होते. त्यांचा वडिलोपार्जित जागेवरून नेहमी वाद होत होता. आरोपी हा मृतकाला नेहमी जागेवरून टोमणे मारून,तू माझ्या पत्नीकडे का पाहतोस असे म्हणत सतत धमकी देत होता.
याच कारणावरून 12 एप्रिल 2021 ला सायंकाळी 7:45 च्या सुमारास आरोपी यशवंतने मृतक कवडू हा आपल्या दोन नातवंडासह घरात असतांना त्याचे डोक्यावर लाकडी टेणप्याने वार करून जखमी केले. मृतक जमिनीवर खाली पडला असतानाही त्याच टेणप्याने त्यास मारले असता कवडू दडमल हे मरण पावले.
मृतकाची पत्नी लिलाबाई कवडू दडमल यांनी घटनेची तक्रार शेगाव पोलीस स्टेशनला केल्यानंतर शेगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय महादेव सरोदे यांनी घटनेचा तपास करून वरोडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात केस दाखल केली. या केसचा निकाल आज 22 एप्रिल 2026 रोज बुधवारला लागून न्यायालयाने आरोपी यशवंत भाऊराव दडमल यास सात वर्षाचा सश्रम कारावास व वीस हजार रुपये चा दंड अशी शिक्षा सुनावली. आरोपीने दंड न भरल्यास आरोपीस सहा महिन्याचा सश्रम कारावा भोगावा लागणार आहे.
या घटनेत सरकार पक्षातर्फे ऍड. उराडे यांनी काम पाहिले. शेगाव पोलीस स्टेशन च्या पोहवा निराशा टेंभेकर यांनी घटनेची पैरवी केली.
Comments
Post a Comment