वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वरोरा येथील व्यापाऱ्यांचा रस्ता बंद ; रस्ता मोकळा करून देण्यासाठी नगरपालिकेला निवेदन.मुत्रीघराचा प्रश्न अजूनही प्रलंबित.

वरोरा येथील व्यापाऱ्यांचा रस्ता  बंद ; रस्ता मोकळा करून देण्यासाठी नगरपालिकेला निवेदन.

मुत्रीघराचा प्रश्न अजूनही प्रलंबित.

वरोरा (जि. चंद्रपूर) – येथील संभुनाथ वरधने यांनी जाण्यायेण्याचा मुख्य रस्ता बेकायदेशीररित्या टीन वेल्डिंग करून बंद केल्याने स्थानिक व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लोकनाथ जयस्वाल (मालिक डी आर जयस्वाल लिकर शॉप) व समस्त व्यापाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अर्जानुसार, गेल्या ३० ते ४० वर्षांपासून हा १०-१२ फूट रस्ता पायवाट व मोटरसायकलसाठी वापरात होता. दिनांक ०४/०४/२०२६ रोजी कोणालाही न विचारता वरधने यांनी हा रस्तावर टीनाचे वेल्डिंग करून बंद केला. यामुळे व्यापारावर त्याचा परिणाम झाला आहे. 

अर्जात  संतोष सेलुकर व कैलास तडसे तसेच अन्य व्यापाऱ्यांचा  पाठिंबा आहे. प्रशासनाने या प्रकरणी लवकरात लवकर पंचनामा करून रस्ता मोकळा करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून देशी विदेशी दारूचे दुकान असल्याने मोठ्या प्रमाणात आंबट शौकीन या ठिकाणी दारू पिल्यानंतर या रोडवरच मूत्रविसर्जन करीत असतात . त्यामुळे बऱ्याच लोकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. यानंतर रोड बंद करून सुद्धा हा प्रकार थांबलेला नाही. त्यामुळे नगरपालिकेचा हा उपाय अडचणीचा ठरत आहे. 
 
आता रस्ता बंद केल्याने आजूबाजूला असलेले गोडाऊन व जाणे येण्यासाठी असणारा जवळचा मार्ग बंद झाल्याने रोडच्या दोन्हीही बाजूच्या व्यापाऱ्यांना जाणे करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

या परिसरात लवकरात लवकर मुत्रीघर बांधण्याची गरज असल्याचे मत व्यापारी वर्गांनी व्यक्त केली आहे. किंवा या ठिकाणी असलेले सर्व दारूचे दुकाने गावाच्या बाहेर नेण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. मात्र बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये मुत्री घराचा मुद्दा वारंवार येऊन सुद्धा नगरपालिकेने कोणताही ठोस निर्णय अजून पर्यंत घेतलेला नाही त्यामुळे हा प्रश्न अजूनच गंभीर होत आहे.
..................


Comments